निराधार महिलांना स्वयंरोजगारासाठी 100 ई-रिक्षा देणार – आ. किशोर जोरगेवार

0
586

निराधार महिलांना स्वयंरोजगारासाठी 100 ई-रिक्षा देणार – आ. किशोर जोरगेवार

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महिला सत्कार कार्यक्रम, योग नृत्य परिवाराचे आयोजन

 

महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देत त्यांना शिक्षित करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत असतांना आजची स्त्री पूर्णत: सशक्त, अन्यायमुक्त झाली आहे का याचे आत्मपरिक्षण करणेही गरजेचे आहे. आपण यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन महिलांच्या सशक्तीकरण्यासाठी काम करत आहोत. निराधार महिलांसाठी ग्रिन आटो ही संकल्पना आम्ही राबविणार असुन 100 निराधार महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त योग नृत्य परिवाराच्या वतीने पठाणपूरा येथील राजीव गांधी उद्यानात जयंती उत्सव प्रभात फेरी व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी योग नृत्य परिवारचे गोपाल मुदंडा, माजी नगरसेवक नंदु नागरकर, पद्मरेखा वानखेडे, माजी नगर सेविका सुनिता लोढीया, श्रीपाद जोशी, सुरेश गोडखे, संतोष गरर्गेलवार, भालचंद्र दाणव, शाईन शेख, आकाश घोडमारे, जितेंद्र सगिरवार, संतोष पिंपळकर, मंगेश खोब्रागडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मुलींचे शिक्षण आणि स्त्रियांचे कल्याण साधण्यात व्यथित केले. मुलींना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी ज्योतिबा फुले यांच्या सहाय्याने पुणे शहरात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर त्यांनी समाजामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध देखील लढा दिला. त्यांनी केलेले कार्य संपूर्ण स्त्रियांसाठी मूल्यवान आहे. त्यांनी त्याकाळी केलेल्या संघर्षामुळेच आजशी स्त्री शिक्षित झाली आहे. आपल्या अधिकारांसाठी जागृत झाली आहे. त्यांचे हे योगदान समाज कधीही विसरणार नाही. असे ते यावेळी म्हणाले.

योग नृत्य परिवारच्या वतीने सुरु असलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी योग नृत्य परिवाराच्या वतीने घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीनेही महिलांसाठी विविध आयोजन केल्या जात आहे. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या हेतुने यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिलांना मंच उपलब्ध करुन देण्याचे काम सुरु आहे. धावपडीच्या जीवनात महिलांचे आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष होते. त्यामुळे विशेष महिलांसाठी आपण आरोग्य शिबिरे आयोजित करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कोणाचाही आधार नसलेल्या महिलांना स्वयंरोजगारातुन आर्थिक सक्षम करण्याचा संकल्प आपण केला. आपण ग्रिन आटो संकल्पना राबविणार असुन या अंतर्गत 100 निराधार महिलांना ई-रिक्षा उपलब्ध करुन देणार असल्याचे ते यावेळी ते म्हणाले. यावेळी जिवन गौरव पुरस्कार प्राप्त पद्मरेखा धनकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला लोक नृत्य परिवाराच्या सदस्यांसह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here