स्माँइल सोशल फाँउंडेशन तथा महिला कॉंग्रेसच्या वतीने चंद्रपूरात पार पडला भोजन व फळ वितरणाचा कार्यक्रम ! 

0
501

विशेष प्रतिनिधी /किरण घाटे

चंद्रपूर -विदर्भ- : महाभयानक कोरोना संकटामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे .इतकेच नाही तर शासनाच्या वतीने लॉकडाउन लावल्यामुळे हातावर आणुन पानावर खाणां-या मजुर वर्गाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे .

अश्या कठीण परिस्थितीत त्यांना जीवन जगणे कठीण हाेवून बसले आहे .तदवतचं मजूर वर्गांच्या हातांना सध्याच्या परिस्थितीत काम नाही .त्यामुळे ते आर्थिक संकटात अडकलेले आहे . दाेन वेळच्या भाेजनाचा प्रश्न त्यांचे समाेर निर्माण झाला आहे .कोरोना राेगाने अनेकांचे मृत्यु देखिल झाले आहे .त्यामुळे सर्वंच जण भयभीत झाले आहे. अश्या कठीण समयी सामाजिक बांधिलकीची भावना जाेपासत नवनिर्मित स्माँइल सोशल फाउंडेशन संस्था तथा चंद्रपूर महिला कॉंग्रेसच्या वतीने आज बुधवार दि. २ जूनला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोरोना रुग्णांना व त्यांचे भेटीसाठी येणां-या नातेवाईंकांसाठी भोजन तथा फळ वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला हाेता .या कार्यक्रमांचा हजाराें नागरिकांनी लाभ घेतला .

सदरहु कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्माँइल सोशल फाउंडेशन संस्थेच्या अध्यक्षा रंजना नागतोड़े , उपाध्यक्ष बबिता अग्रवाल, सचिव डि. एस. ख्वाजा, कोषाध्यक्ष सीमा ठाकुर, सहसचिव भुनेस्वरी धर्मपुरीवार महाराष्ट्र महिला कॉंग्रेस सचिव नम्रता ठेमस्कर, स्वाति त्रिवेदी, शीतल कातकर, वाणी दारला, लता बारापात्रे, हर्षा चांदेकर, राजेश सिंग चव्हाण, नेत्रा इंगुलवार आदींनी अथक परिश्रम घेतले .शहरवासियांनी या कार्यक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here