पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास चंद्रपूरात महिलांचा भव्य मोर्चा काढु ! जिल्हा प्रशासनास स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरेचा इशारा !

0
502

पालकमंत्र्यांनी घेतलेला निर्णय मागे न घेतल्यास चंद्रपूरात महिलांचा भव्य मोर्चा काढु ! जिल्हा प्रशासनास स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरेचा इशारा !
चंद्रपूर 🟢🌀🟣किरण घाटे🌼🛑🟨

☀️🌼युवा स्वाभिमानी पक्ष चंद्रपूरच्या वतीने दि.२डिसेंबर २०२०ला चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वात बेरोजगार व असंघटित कामगार यांच्या मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला होता. परंतु त्यावर जिल्हा प्रशासनाने कुठलाही निर्णय न घेतल्याने युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी दि.4 जानेवारी 2021 रोजी थेट जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेऊन त्यांच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याबाबत त्यांनाच निवेदन दिले
☀️🌀🟢युवा स्वाभिमानी पक्ष चंद्रपूर यांच्याद्वारे जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये युवा स्वाभिमानी पक्षातर्फे केलेल्या मागण्यांपैकी (पहिली मागणी ) पालकमंत्री चंद्रपूर हे पालकमंत्री म्हणून योग्य नाहीत तथा पालकमंत्र्यांनी बेरोजगारांना व असंघटित कामगारांना न्याय देण्याचे सोडून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेली दारू बंदी हटविण्यात करता आपली पूर्ण ताकत लावली आहे 🌀🟣🟢हे अत्यंत चुकीचे असून यामुळे हजारो घरे बर्बाद होतील .त्यामुळे पालकमंत्र्यांनी आपली ताकद ही चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याकरीता व असंघटित कामगारांना न्याय देण्याकरिता वापरावी असे निवेदनात म्हटले आहे
🔶☀️💠🌀🟣चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना महासंकटात पोलीस प्रशासनाने अतिशय उत्तम पणे जिल्हा बंदी पाळली व जिल्ह्यामध्ये येणांऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तथा लोकांची योग्य पध्दतीने माहिती आपल्या जवळ ठेवली

🌼💠🌀अश्याच प्रकारची पद्धत पोलीस प्रशासन दारूबंदी गुटखा बंदी बाबत का राबवत नाही ?
असा सवाल ही या निवेदनातून करण्यात आला आहे . 🟢🌀🟩🟥💠शासकीय यंत्रणेने आपले काम प्रामाणिक पणे बजविल्यास दारूबंदी व गुटखा बंदी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यशस्वी हाेईल.अशी अपेक्षा देखिल त्यांच्याकडून या निवेदनातुन युवा स्वाभिमानी पक्ष चंद्रपूर यांनी केलेली आहे.

🟢🌀🌼🟣या शिवाय जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून रेती चोरी, कोंबडा बाजार, जुगार, याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली परंतु स्थानिक पोलिसांकडून या सर्व गोष्टींना पाठबळ देण्यात येत असल्याने जिल्ह्यांमध्ये अवैध धंदे फार मोठ्या प्रमाणामध्ये फाेफावले आहेत.
🌼🟢🟣 त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासनाची भूमिका ही संशयास्पद आहे . पालकमंत्र्यांनी घोषित केल्या प्रमाणे ज्या पोलिस निरीक्षकांच्या हद्दीमध्ये अवैध धंदे दिसतील त्यांना निलंबित करण्याचे काम पालकमंत्र्यांनी करावे अशी मागणी सुध्दा युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी एका लेखी निवेदनातून जिल्हाधिकारी विजय गुल्हाने यांना केली आहे.

🟢🟡☀️🟣सदर मागण्यांच्या संदर्भात19 जानेवारी 2021 पर्यंत प्रशासनाकडून उत्तर न मिळाल्यास 20 जानेवारी 2021 रोजी हजारो महिलांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांनी एका लेखी निवेदनातून नुकताच दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here