आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिकेच्या स्वच्छता दुतांसह साजरा केला नववर्ष

0
204

आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिकेच्या स्वच्छता दुतांसह साजरा केला नववर्ष

पुष्पगुच्छ, भेट वस्तु देत सच्छता कामगारांना दिल्या नव वर्षाच्या शुभेच्छा


दरवर्षी नव वर्षाची सुरवात आमदार किशोर जोरगेवार हे कष्ट करणा-या, सेवा देणा-या कामगारांसह करतात. यंदा त्यांनी स्वच्छता दुत असलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचा-यांसह आपला नव वर्षाचा पहिला दिवस साजरा केला आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांना पूष्पगुच्छ आणि भेट वस्तु देत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात.
यावेळी संजय गांधी मार्केट येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मनपाचे वैद्यकीय स्वच्छता अधिकारी डाॅ. अमोल शेळके, मुख्य स्वच्छता निरीक्षक भुपेश गोटे, मुख्य स्वच्छता निरीक्षक उदय मैलारवार, स्वच्छता निरीक्षक जगदीश शेंद्रे, प्रभारी स्वच्छता निरीक्षक जेमा रंगारी, राजु सोम, अनिल चिंचोळकर, शुभम खोटे, रामचंद्र बोमीडवार, देविदास येवले कैलास ढवळे, श्री महाकाली माता महोत्सवाचे सचिव अजय जयस्वाल, माजी नगरसेवक बलराम डोडाणी, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज शहर प्रमुख सविता दंढारे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, शहर संघटक विश्वजीत शहा, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, प्रा. श्याम हेडाऊ, सलिम शेख, नकुल वासमवार, युवती प्रमूख भाग्यश्री हांडे, कौसर खान, शमा काजी, कल्पना शिंदे, चंद्रशेखर देशमुख, बबलु मेश्राम, आशा देशमुख, अस्मिता डोणारकर, प्रमिला बावणे, रजनी कुंभारे, वंदना हजारे, अनिता झाडे, माधूरी बावणे, रुपा परसराम, ताहिर हुसेन, किशोर बोलमवार आदींची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांनी नववर्षाची सुरवात कामगारांसोबत केली. यावेळी त्यांनी नववर्ष चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांसोबत साजरा केला. चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छता कर्मचारी कष्टकरी आहे. ते प्रामाणिकपणे शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत आहे. या वर्गाचा सन्मान झाला पाहिजे. त्यांच्या कामाचा सन्मान झाला पाहिजे यासाठी आपण नववर्ष या कर्मचार्यांसोबत सोबत साजरा करत असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. शहरात आपण माता महाकाली महोत्सवाला सुरवात केली आहे. शहरात अनेक सार्वजनिक उत्सव साजरे केले जातात. मात्र उत्सव संपताच मध्यरात्र पर्यंत जागत आपण रात्रोच शहर स्वच्छ करता, या पेक्षा मोठी सेवा नाही. आम्ही नाली, रस्ते तयार करतो पण ते स्वच्छ ठेवण्याचे काम आपण करत आहात. आपल्या सेवेचा मोल दिल्या जाऊ शकणार नाही असे ते यावेळी म्हणाले.
येथे काम करणा-या कामगार वर्गाला सन्मानजनक वागणूक दिल्या गेली पाहिजे, पूर्ण सुरक्षा साधने उपलब्ध करुन दिल्या गेली पाहिजे, अशा सुचनाही यावेळी उपस्थित अधिका-र्यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्यात. जवळपास पाच लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम हे कर्मचारी करत आहे. रोज नित्यनियमाने त्यांच्याकडून सुरु असलेले स्वच्छतेचे काम कौतुकास्पद आहे. या कर्मचा-यांमुळेच इतके मोठ शहर आपण स्वच्छ ठेवू शकलो ही सत्यस्थिती असल्याचे ते यावेळी म्हणाले.
नागरिक हे वेगवेळ्या पद्धतीने नव वर्ष साजरा करत असतात मात्र आ. किशोर जोरगेवार मागील अनेक वर्षांपासून नववर्षाची सुरवात अभिनव पद्धतीने करत असून देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगार वर्गासोबत वेळ घालवून ते हा दिवस साजरा करतात. या पूर्वी त्यांनी वेकोलिच्या भूमिगत खदानीत जाऊन अतिशय कठीण परिस्थितीत काम करत असलेल्या वेकोलिच्या कर्मचाऱ्यांसोबत नववर्षाचा पहिला दिवस साजरा केला होता. त्यानंतर त्यांनी राज्याला वीज देणा-या विज निर्मिती प्रकल्पात जात तेथील कामगारांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तर नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासकिय वैद्यकिय सेवा मिळावी यासाठी वैद्यकीय रुग्णालयाची ईमारत तयार करत असलेल्या कामगारांची भेट घेत त्यांना भेट वस्तु दिल्या होत्या. तर यंदाच्या नववर्षाची सुरुवात त्यांनी स्वच्छता दुत असलेल्या महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचा-यांची भेट घेत त्यांच्यासोबत केली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या भेटी नंतर स्वच्छता कर्मचा-यांनीही आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानत त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी जवळपास 700 स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here