अन् ‘ताे’ बहुचर्चित लाचखाेर मंडळ अधिकारी परत एका पुनर्रस्थापित आदेशाने तीन महिण्यानंतर कामावर रुजू …?

0
630

अन् ‘ताे’ बहुचर्चित लाचखाेर मंडळ अधिकारी परत एका पुनर्रस्थापित आदेशाने तीन महिण्यानंतर कामावर रुजू …?

 

चंद्रपूर, किरण घाटे – विशेष प्रतिनिधी : एका शेतजमीन फेरफार प्रकरणात शेतक-यांकडुन दीड हजार रुपयांची लाच घेतांना भद्रावती तालुक्यातील नंदाेरीचा नियमित मंडळ अधिकारी तथा चंदनखेडा येथील अतिरिक्त मंडळाचा कार्यभार सांभाळणारा प्रशांत बैस चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या जाळ्यात १एफ्रिलला भद्रावती तहसील कार्यालयात लाच घेतांना जाळ्यात अडकला हाेता .त्या नंतर एसीबीने या बाबत सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला .त्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी लाचखाेर मंडळ अधिकारी प्रशांत बैस यांना निलंबित केले .तीन महिण्यांच्या कालावधी नंतर एसीबीच्या जाळ्यात लटकलेल्या या बहुचर्चित मंडळ अधिका-याने नियमित कामावर घ्या असा एक अर्ज जिल्हा प्रशासनाला सादर केला हाेता .त्याच अर्जाच्या आधारे प्रशासनाने या मंडळ अधिका-याचा पुनर्रस्थापित आदेश याच महिण्यात केला असुन त्या मंडळ अधिका-यास चंद्रपूर जिल्ह्यातिल धाबा मंडळाचा नियमित कार्यभार साेपविल्याचे खात्रीलायक व्रूत्त आहे.

 

 

दरम्यान निलंबित मंडळ अधिकारी बैस यांना निलंबित कालावधीत त्यांचे मुख्यालय गाेंडपिपरी तहसील कार्यालय ठेवण्यांत आले हाेते .सध्या प्रशांत बैस यांचेवर विभागीय चाैकशी प्रस्तावित करण्यांचे संदर्भाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने भद्रावती तहसीलदार कडे पत्रव्यवहार सुरु झाल्याचे समजते .या विभागीय चाैकशी पत्रात नेमके काेणते मुद्दे ठेवण्यांत आले हे मात्र कळु शकले नाही .परंतु विभागीय चाैकशी लवकरच आरंभ करण्यांच्या द्रूष्टीकाेणातुन जाेरदार हालचाली सुरु झाल्या असल्याचे विश्वासनिय व्रूत्त आहे.

 

 

अनेक कास्तकारांना व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणां-या या बहुचर्चित मंडळ अधिका-याची तक्रार एसीबी कडे चंद्रपूरच्या एका शेतकरी दादाने केली हाेती. त्याच एसीबीच्या जाळ्यात हे मंडळ अधिकारी अडकले हाेते .फेरफार प्रमाणित करण्यांसाठी या मंडळ अधिका-याने चक्क दीड हजार रुपयांची लाच मागितली हाेती. गल्लेलठ्ठ पन्नास ते साठ हजार रुपये प्रतिमाह वेतन उचलणां-या बैस यांना रकमेचा माेह आवरता आला नाही .त्यामुळे ते अलगद जाळ्यात अडकले .त्यांचेवर कारवाई हाेताच वराेरा तालुक्यातील जनतेनी आंनदाेत्सव साजरा केला हाेता .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here