उस्मानाबाद रुग्णालयात पाणी दान उपक्रम सुरुच ! 

0
516

उस्मानाबाद रुग्णालयात पाणी दान उपक्रम सुरुच ! 

उस्मानाबाद :-किरण घाटे विशेष प्रतिनिधी – रुग्ण कल्याण समितीच्या पाणीदान उपक्रमात आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते प्रविण बनसोडे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून काल रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पाणीदान केले तर याच दिवशी दिव्यांगासाठी मिठाईचे वाटप केले. पाणीदान उपक्रमात सहभाग नाेंदविल्या बद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .डि .के .पाटील यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच रुग्ण कल्याण समितीच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यांत आल्या या वेळी प्रामुख्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .डि. के पाटील,प्रविण बनसोडे, विकास बनसोडे,हुंकार बनसोडे,रमेश गंगावणे,बनसोडे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य अब्दुल लतिफ,गणेश रानबा वाघमारे इतर सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here