उदयनराजेंच्या शपथविधी वादावरुन व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात पोंभूर्णात आंदोलन

0
362

पोंभुर्णा : राज्यसभा सदस्यांच्या शपथविधीच्या वेळी उदयनराजेंच्या जय भवानी जय शिवाजी या उद्घोषावर आक्षेप घेतल्यावरुन राज्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली. राज्यसभा खासदारांनी काल (22 जुलै) शपथ घेतली. यावेळी भाजप नेते उदयनराजे यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी उदयराजेंना समज दिली होती. “तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’ असं व्यंकय्या नायडू म्हणाले. त्यांच्या याच वक्तव्याच्या विरोधात मोठा वाद निर्माण झाला आहे.

राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहामध्ये उदयनराजे यांना घोषणा देण्यापासून रोखल्यामुळे आज राज्यभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. त्यासाठी राज्यातील विविध भागांत आंदोलनं करण्यात आली.
पोंभुर्णा तालुका शिवसेनेच्या वतीने व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्याचा निषेध करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ शिवसेना नेते दिलीप कपूर युवासेना उपजिल्हाप्रमुख आशिष कावटवार, शिवसेना तालुकाप्रमुख विनोद चांदेकर शहर प्रमुख गणेश वासलवार, विजय वासेकर युवा सेना तालुका प्रमुख अभिषेक बद्दलवार, शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार, राजू नीलमवार तथा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here