अपघातग्रस्त लग्न वऱ्हाडातील जखमीकरिता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने केली उपचाराची व्यवस्था

0
594

अपघातग्रस्त लग्न वऱ्हाडातील जखमीकरिता पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने केली उपचाराची व्यवस्था

चंद्रपूर, दि. 25 फेब्रुवारी :   सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे आज दुपारी विवाह सोहळा आटोपून परत जात असलेल्या लग्न वऱ्हाडाच्या ट्रकला कच्छेपार येथे नर्सरीजवळील झाडावर आदळून अपघात झाल्याने पाच वऱ्हाडी ठार तर 22 वऱ्हाडी जखमी झाले होते. याबाबत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना फोनवर माहिती मिळताच त्यांनी याची तात्काळ दखल घेवून जखमींवर उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या.

पालकमंत्री वडेट्टीवार आज मंत्रालयातील बैठकीत व्यस्त असतांनाही त्यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंदेवाही येथील आरोग्य यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणेला तसेच पालकमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या व जखमीवर उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. अपघातात जखमींना तातडीने उपचाराची सोय झाली असल्याचे पालकमंत्री यांचे कार्यालयातून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here