जीर्ण झालेल्या सार्वजनिक शौचालय च्या जागी नवीन शौचालय बनवून देण्याची विलास वनकर यांची मागणी…

0
273

जीर्ण झालेल्या सार्वजनिक शौचालय च्या जागी नवीन शौचालय बनवून देण्याची विलास वनकर यांची मागणी…

 

आज दि. २१ ऑक्टोबर ला घुग्घूस अमराई वॉर्ड क्रमांक १, उडीया मोहल्ला येथील झोपडपट्टीतील अनेक वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असलेल्या सार्वजनिक शौचालय च्या जागी नवीन सार्वजनिक शौचालय चे बांधकाम करून देण्याची मागणी अमराई वॉर्डातील रहिवासी महेंद्र बाग यांनी केली आहे. या परिसरातील महिला उघड्यावर शौचालयाला जातात. प्रशासनाकडे घरगुती शौचालय साठी अर्ज करूनही शौचालय मिळाले नाही. त्यामुळे या परिसरातील महिला नाईलाजाने उघड्यावर शौच करण्यास मजबूर आहे. या महिलांची समस्या लक्षात घेऊन आज दूरध्वनीवरून बोलुन लगेच अपक्ष आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचा सुचनेनुसार यंग चांदा ब्रिगेडचे घुग्घुस शहर संघटक विलास वनकर यांनी तत्काळ नगरपरिषदचे कर्मचारी हरिष जोगी यांचा सबोत पाहणी करून लवकरात लवकर स्वच्छताचे परिसरातील वातावरण करून नवीन सार्वजनिक शौचालय बनवून देण्यात यावे.

यावेळी सामाजिक नेता महेंद्र बाग, यंग चांदा ब्रिगेड व बहुजन महिला आघाडीचे अध्यक्षा सौ. उषाताई आगदारी,सौ. कांता बाग, सौ. बनीता निहाल आणि सौ. सुतो बाग यांनी ही जबाबदारी खांद्यावर घेऊन ग्राम पंचायत पासून सध्याच्या नगर परिषद घुग्घुसकडे ही मागणी धरून लावली. त्यांच्या मागणीला ग्राह्य धरून नगर परिषद घुग्घुसच्या मुख्याधिकारी साहेब यांनी प्रत्यक्ष जागेची भेट घेऊन महेंद्र बाग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्याच जुन्या सार्वजनिक शौचालय च्या जागेवर नवीन शौचालय बांधुन देण्याचे मान्य केले. तसेच या सार्वजनिक शौचालय मधे पाण्याची व्यवस्था, दिवाबत्तीची व्यवस्था व वेळोवेळी साफसफाई कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येण्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here