माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानचे थाटात उदघाटन

0
657

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज उद्यानचे थाटात उदघाटन

 

 

वणी/यवतमाळ, मनोज नवले 

यावर्षी झालेल्या अति्रुष्टी मूळे शेतमालाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आम्ही मागणी करत आहो.मात्र आघाडी सरकारला शेतकऱ्यांसी काही देणेघेणे नाही.बळीराज्याला आज आधार देण्याची गरज असल्याने.आघाडी सरकारणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे.असे आवाहन विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

वनी नगर परीषदेच्या विकासाच्या गतीला चालना देणारे वणीचे नगराध्यक्ष मा.तारेंद्र बोर्डे यांच्या आणि वणी विधानसभा क्षेत्रातील आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणीचा विकास साधला आहे.वणी येथील खंडर झालेल्या उद्यानाला नवी संजीवनी प्राप्त झाली असुन आज या उद्यानाचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अतिशय थाटात पार पडला.

या प्रसंगी मा.फडणवीस यांनी वणीच्या विकासा बाबत नगराध्यक्ष आणि आमदार याचे गुणगान गायले.त्यासोबत याला वणीकर जणतेचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या उद्यानातील कलाकुसर करणा-यांना यथेच्छ सन्मान चिन्हे देऊन गौरविण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्यात नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, वनी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार, जिल्हाध्यक्ष भा.ज.पा.श्री.नितीनजी भुतडा, उपाध्यक्ष. न.प.वणी श्रीकांत पोटदूखे,मुख्याधिकारी न.प.वणी. अभिजीत वायकोस,एकहाती सत्ता असणाऱ्या सर्व भाजपचे प्रभाग 1 व 13 क्रमांकातील सदस्य कमिटी प्रामुख्याने उपस्थित होती.आणि छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या जयघोशाने संपूर्ण सभामंडप गजबजून गेला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here