इम्पॅक्ट 24 न्यूज च्या वृत्ताची दखल घेत शेतकऱ्याचे सांत्वन करत शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार

0
209

इम्पॅक्ट 24 न्यूज च्या वृत्ताची दखल घेत शेतकऱ्याचे सांत्वन करत शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतला पुढाकार

राजुरा, 4 ऑगस्ट (अमोल राऊत) : “आगीत होरपळून एक बैल दोन गायी ठार, पाचगाव येथील घटना” या मथळ्याखाली impact24news ने आज सकाळी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत राजुऱ्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे सांत्वन करत त्यांना शासकीय मदत लवकरात लकवर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
काल रात्री पाचगाव (मडावीगुडा) येथे रवींद्र जोगी यांच्या गोठ्याला आग लागून त्यात एक बैल, दोन गायी, कोंबड्या, खत व कीटकनाशके यासह गोठ्यावरील लाकूडफाटा जळून खाक झाला. यामुळे सदर शेतकऱ्यावर ऐन शेती हंगामात दुःखाचा डोंगर कोसळला. राजुरा येथील शिवसेना पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची गंभीरतेने दखल घेतली. यावेळी बबनभाऊ उरकुडे, निलेशभाऊ गंम्पावार, उमेश गोरे, मनोज करवटकर, कलाबाई ईदुरवार यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांनी स्वतः 9 तारखेला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले.

advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here