ऑनलाईन गेमिंग पासून मुलांना दूर ठेवा – अॅड. चैतन्य भंडारी

0
446

ऑनलाईन गेमिंग पासून मुलांना दूर ठेवा – अॅड. चैतन्य भंडारी

 

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – आजच्या धावपळीच्या जीवनात आई-वडील हे दोघे ही आपापल्या कामामुळे मुलांना वेळ देवू शकत नाही आणि त्याचा परिणाम आपल्या सर्वांच्या समोर दिसत आहेत. जसे की, आजची मुले बहुतांश वेळी आपापल्या मोबाईलवर आनलाईन गेम्सवर मग्न असतात व डिजिटल जगात वावरत असतात आणि जी मुले ही मोबाईल गेम्सबाबत आकर्षित झालेली आहेत ती मुले आईवडिलांना न विचारता आनलाईन गेम्सवर पैसे देखील लावत आहे व आपल्या आईवडिलांचा मेहनतीचा पैसा त्यात उडवत आहे आणि ही सवय आईवडीलांपासून लपविण्यासाठी ते गुन्हेगारी प्रवृत्तीचा अवलंब करीत आहे. त्यामुळे ही मुले स्वत:चे आता किडनॅपिंग वा अपहरण झाले आहे अशी खोटी बातमी देखील पसरवितात म्हणून प्रत्येक आईवडिलांचे कर्तव्य आहे की, त्यांनी आपल्या मुलांकडे स्मार्ट फोन देताना ते मोबाईलवर काय-काय करतात याची माहिती ठेवून त्यांच्यावर वॉच ठेवावा किंवा त्यांचा मोबाईल चेक करत राहावा. हे ऑनलाईन गेम्स खेळता खेळता ही मुले पेड गेम्स देखील विकत घेवून आपल्या आईवडिलांचे बँक खाते रिकामे करतात म्हणून आईवडिलांनी आपले बँक खात्याचे पिन आपल्या मोबाईल फोन मध्ये सेव्ह करु नये. तसेच त्यांचा मोबाईलमध्ये ‘पॅरंटीन कंट्रोल’ नावाचे सॉप्टवेअर देखील वापरावे जेणेकरुन ते मोबाईल मध्ये काय-काय करतात हे आई-वडीलांना सहज कळेल अशी माहिती ॲड. भंडारी यांनी दिली आहे.

जेवढा अधिक वेळ मुलांकडे मोबाईल असणार आहे तेवढा त्यांचा मानसिक विकास कमी होणार आहे व मोबाईल मुलांना न दिल्यामुळे ते रागीट देखील होत आहे तसेच त्यांची विचार करण्याची क्षमता देखील कमी होत आहे.

म्हणून प्रत्येक आई-वडीलांनी आपल्या मुलांसाठी वेळ काढावा व त्यांच्याशी मनमोकळे संवाद साधावे जेणेकरुन त्यांना होणा-या ऑनलाईन अडचणी ते तुमच्या शेअर करु शकतील व काय विचार करताहेत, त्यांना काय पाहिजे या सर्व गोष्टी ते तुम्हाला सांगतील. व जर आईवडीलांना वाटत असेल की आपल्या मुलाने आईनलाईन गेमिंग जसे फी फायर, पबजी इ. यांच्यापासून दूर राहावे तर आपल्या मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे जेणेकरुन मुले ऑनलाईन जगात कमी राहतील, ऑनलाईन गेम्स खेळणे हे सायबर क्राईम नसून ही मुलांची सायबर सायकोलॉजी होत चालली आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की, मुलांना मोबाईल देवूच नये परंतु मुलांना मोबाईल देण्याअगोदर त्यांना समजावून सांगावे की जसे शाळा, कॉलेज यांचे वेळापत्रक असते त्याच पध्दतीने गेम खेळण्याचे देखील वेळापत्रक बनवून द्यावे असे देखील अॅड. भंडारी यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here