राज्यात अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा निर्णय

0
450

राज्यात अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा निर्णय

सोहळे, समारंभ, पुष्पगुच्छ, होर्डींग्ज, जाहिरातींवरील खर्च टाळून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहन

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

 

मुंबई, दि. 21 :– अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे राज्यात शंभरहून अधिक नागरिकांचा झालेला मृत्यू, पशुधनाची झालेली हानी, शेतजमिन व पिकांचं नुकसान, घरांची व दुकानांची पडझड, या सगळ्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उद्या (22 जुलै) त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसंच हितचिंतकांनी माझा वाढदिवस साजरा करु नये, वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून तो निधीतून राज्यातील पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा उद्या (22 जुलै रोजी) वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, हितचिंतकांनी कोणत्याही सोहळे-समारंभांचे आयोजन करु नये, पुष्पगुच्छ पाठवू नयेत, होर्डिंग्ज् लावू नयेत, वृत्तपत्रे, टिव्ही, समाजमाध्यमांवर जाहिराती प्रसारित करु नयेत, यावर होणारा खर्च वाचवून त्या निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना मदत करावी. लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here