लंपी आजारापासुन बचावाकरिता ग्रामपंचायतीकडून सहकार्य करू-सरपंच नरेश सातपुते

0
407

लंपी आजारापासुन बचावाकरिता ग्रामपंचायतीकडून सहकार्य करू-सरपंच नरेश सातपुते

कवठाळा येथे लंपी आजाराचे शंभर टक्के लसीकरण

 

 

नांदाफाटा : कोरपणा तालुक्यातील कवठाळा येथे गावातील जनावरांना लंपी या आजाराची लागण होऊ नये आणि गावातील जनावरे निरोगी राहावे या उद्देशाने गावात घरो घरी जाऊन लंपी आजाराचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यात आले. सध्या जिल्ह्यात व राज्यात लंपी या महाभयानक आजाराने थैमान घातले असून या आजारामुळे अनेक जनावरांना मृत्यू च्या दारी जावे लागत आहे. या आजारापासून आपले गाव मुक्त राहावे या उद्देशाने कवठाळा येथे ग्रामपंचयत च्या माध्यमातून गावात जण जागृती करून आजारा पासून आपले जनावरे कसे निरोगी राहतील या बाबत २६ सप्टेंबर ला गावातील घरो घरी जाऊन जनावरांना लसीकरण देण्यात आले. या वेळी कवठाळा गावाचे सरपंच नरेश सातपुते,पशुवैद्कीय अधिकारी डॉ. ढेंगे साहेब व अशावर्कर, पशुमालक, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here