झरण जवळ तवेराची दुचाकीला धडक
दुचाकीचालक गंभिर जखमी

गोंडपिपरी(सुरज माडुरवार)
सायंकाळी ७ च्या सुमारास झरण देवई फाट्याजवळ तवेरा ची दुचाकीला जबर धडक बसली त्यात दुचाकी चालक गंभिर जखमी झाला.
MH ३४ AM ४७८२ तवेरा बेरडी येथील प्रवाशांना घेऊन विसापूर कार्यक्रमा करिता गेले होते.विरुद्ध दिशेने येणारा गणपूर येथील राकेश मेश्राम याच्या दुचाकीला धडक बसली.त्यात राकेश गंभिर जखमी झाला.तवेरामधील ४ महिला सर्व राहणार बेरडी हे किरकोळ जखमी झाले असून पुढील तपास कोठारी चे ठाणेदार चव्हाण करीत आहे.