वाढीव मानधन द्या ! राष्ट्रीय आराेग्य अभियान कंत्राटी कर्मचा-यांचे निवेदन !

0
859

वाढीव मानधन द्या ! राष्ट्रीय आराेग्य अभियान कंत्राटी कर्मचा-यांचे निवेदन !

🟪चंद्रपूर🟨🟣किरण घाटे🟩🟨 आज साेमवार दिनांक 18 जानेवारीला राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांचे मनुष्यबळ सुसूत्रीकरण नुसार वाढीव मानधन व फरक दिनांक 31 जानेवारी 2021 पर्यंत अदा करण्यात यावे या करिता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना राष्ट्रीय अभियान आराेग्य कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आले. सदरहु मागणीची पुुर्तता न झाल्यास दि. 4 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हा परिषद चंद्रपूर समोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणा आंदोलन करण्यात येण्याचा इशारा निवेदनातुन देण्यांत आला आहे . 🟡🟩🟣💠🟪निवेदन देतांना संघटनेचे अध्यक्ष राकेश नाकाडे , कार्याध्यक्ष प्रकाश मोहूर्ले, नामदेव येनूरकर, धनवार, कैलास वारके, श्वेता अलीवार, रुपाली बाजाईत, सुलोचना लांडगे, ज्योती वाकुलकर , श्वेता तांड्रा ,अनिता वानखेडे आदि कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here