जिल्ह्यात 18 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण

0
483

जिल्ह्यात 18 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण

सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहणार

बाबूराव बोरोळे
जिल्हा प्रतिनिधी लातूर
Impact 24 news 

 

 

जिल्हयातील कोवीड-19 लसीकरणाचे दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजीचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 18 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे.
उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथे पहिला व दुसरा कोव्हीशिल्ड,उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड प्राधान्याने दुसरा कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड प्राधान्याने दुसरा कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय औसा येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व प्राधान्याने दुसरा कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय चाकूर येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व प्राधान्याने दुसरा कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे प्राधान्याने दुसरा कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय देवणी येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व प्राधान्याने दुसरा कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय जळकोट येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड प्राधान्याने दुसरा कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड, ग्रामीण रुग्णालय कासारशिरसी येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व प्राधान्याने दुसरा कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय रेणापूर येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व प्राधान्याने दुसरा कोव्हॅक्सीन, ग्रामीण रुग्णालय बाभळगाव येथे पहिला व दुसरा कोविशिल्ड व प्राधान्याने दुसरा कोव्हॅक्सीन, जिल्हयातील सर्व प्रा. आ.केंद्र व कार्यक्षेत्र लसिच्या उपलब्धतेनुसार व सुक्ष्मकृती आराखडयानुसार पहिला व दुसरा कोविशिल्ड, प्राधान्याने दुसरा कोव्हॅक्सीन ऑनस्पॉट डोस सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत सुरु राहणार.

 

18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सीनचा केवळ दुसरा डोस लसीच्या उपलब्धते नुसार देण्यात येणार आहे. 18 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लातूर जिल्हयात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याचे कार्यक्षेत्रात उपलब्ध्‍ साठयानुसार व प्रा.आ.केंद्राच्या सुक्ष्मकृती आराखडया नुसार दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी कोविशिल्ड / कोव्हॅक्सीन लसीचे लसीकरण करण्यात येत आहे. लातूर जिल्हयातील नागरीकांनी कोवीड-19 लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास 02382-223002 कोवीड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here