⭕जय भवानी कामगार संघटनेची शाखा आज दिनांक २१/१०/२० रोजी चंद्रपूर मेडिकल कॉलेज येथे गठित
आज दिनांक २१/१०/२० रोजी जय भवानी कामगार संघटनेचे शाखा चंद्रपूर मेडिकल कॉलेज येथे स्थापन करण्यात आले या प्रसंगी शाखेचे पदाधिकारी श्री नितीन कूमरे, श्री. शिवपाल शुक्ला, श्री. सुमित दुधे, श्री. सचिन बांबोडे, तथा श्री. महेश हजारे , श्री.राहुल चव्हाण, कुकु सोनायी , निखिल बाजयेत, इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कामगारांवर सातत्याने कामगार जागा कंपनीमध्ये काम करीत असतात किंवा आहेत त्या कंपन्यांमधील कंत्राटदार अथवा कंपनी मालक हे कामगारांना शासनाने दिलेल्या नियम व अटींचे पालन न करता राबवून घेतात त्यांचे पैसे देखील देत नाहीत या बाबी विरोधामध्ये जय भवानी कामगार संघटना गेल्या एक वर्षापासून सक्रियतेने काम करीत असून चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये सुरू असलेल्या कंत्राटी पद्धतीने उत्खननामध्ये काम करीत असलेल्या कामगारांना न्याय मिळवून देण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर यश प्राप्त केले आहे व जवानी कामगार संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम हे सातत्याने सुरू असल्याने जय भवानी कामगार संघटनेच्या कामाच्या पद्धती कडे बघून अनेक कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेले कामगार आपल्यावर होत असलेल्या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी संपर्क करीत आहेत त्यातीलच आज एक पाहून समोर टाकत जय भवानी कामगार संघटनेने चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांकरिता आपली शाखा त्याठिकाणी घटित करून कंत्राटी पद्धतीने काम करीत असलेल्या कामगारांना न्याय मिळवून देण्याकरता चंद्रपूर शहरांमध्ये देखील शंख फुंकले आहे ,
दिवसागणिक जय भवानी कामगार संघटनेवर चंद्रपूर जिल्ह्यातील असंघटित कामगारांचा वाढता विश्वास हा संघटनेच्या वाढीस कारणीभूत ठरली आहे असे एकंदर चित्र सर्वत्र दिसत आहे.