जिजाऊ व सावित्रीबाई यांची जयंती संयुक्तपणे साजरी

0
439

जिजाऊ व सावित्रीबाई यांची जयंती संयुक्तपणे साजरी
सास्ती टाउनशिप येथे प्रबोधिनी मंच व पंचशील मंडळाचे आयोजन

राजुरा, तालुका प्रतिनिधी – सास्ती टाऊनशिप येथे राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम प्रबोधिनी उपासिका संघ आणि सार्वजनिक पंचशील मंडळ, सास्ती टाऊनशिप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रबोधिनी उपासक संघाच्या अध्यक्ष चैताली खोब्रागडे होत्या. प्रमुख अतिथी कविता मडावी, कुमारी श्रुती मोहितकर, सुवर्णलता बोंडे ,सरपंच मैना नन्नावरे, मारुती जुलमे, दिवाकर जनबंधू इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुवर्णलता बोंडे म्हणाल्या की, सावित्रीबाई आणि राजमाता जिजाऊ यांचे कार्य आणि विचार आपल्या मुलींच्या मनावर बिंबवून त्यांना नवविचाराने प्रेरित करण्याचे कार्य महिलांनी केले पाहिजे. श्रुती मोहितकर यांनी सांगितले की, आजची आदर्श पिढी घडवायची असेल तर स्त्रियांना स्वतः राजमाता जिजाऊ बनावे लागेल, तेव्हाच घराघरात छत्रपती शिवाजी महाराज घडतील. सामाजिक कार्यकर्त्या कविता मडावी म्हणाल्या की, सावित्रीबाई यांच्या सारखे समाजसेवा व स्त्रियांची प्रगती होण्यासाठी कार्य करण्यास महिलांनी घराबाहेर पडून संघटितपणे जातपात न मानता कार्य करण्याची गरज आहे तसेच आपले संविधानिक हक्क अबाधित ठेवण्यासाठी सर्व बहुजन समाजाने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे मत मांडले. याप्रसंगी सरपंच मैनाबाई नन्नावरे यांनी आपले विचार मांडले.

अध्यक्षीय भाषणात चैताली खोब्रागडे यांनी आजची स्थिती महिलांसाठी कठीण झाली असल्याचे सांगून आता आपल्याला राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांनी त्यागाच्या कार्याची आठवण ठेवून स्मरून कार्य करावे लागेल, असे मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्मला खैरकर व आभार प्रदर्शन ब्राह्मणे ताई यांनी केले. सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रबोधिनी प्रबोधिनी उपासिका संघाच्या ठमके, पडवेकर, जनबंधू, करमनकर, मोहितकर, जुलमे या भगिनी आणि सार्वजनिक पंचशील मंडळाचे कार्यकर्ते सच्चिदानंद रामटेके, वासुदेव माऊलीकर, विजय खेडकर, भीमराव पडवेकर, रवींद्र निकोसे, जोतिबा करमनकर, शैलेश पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला राजुरा, रामपूर, धोपटाळा, सास्ती येथील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here