आरोग्यनीती घरोघरी

0
398

मुंबई प्रतिनिधी : महेश कदम

*“आरोग्यनीती घरोघरी”*

संपूर्ण विश्व “नीती” वर सुरू असते. मग राजनीती असो की समाजनीती आणि अर्थनीती हे सगळं मानवी विकासासाठी आहे. पण आता कोरोना काळात कधी नव्हे इतकं महत्व आणि जागरूकता आरोग्या बाबत निर्माण झाली आहे. आणि जो शरीराने, मनाने सुदृढ असेल तोच महामारी च्या काळात वाचणार आहे.

तेव्हा मग सर्वांना समजेल आणि कळेल, जगणं अधिक समृद्ध, संपन्न, सुंदर, आश्वासक होईल अशी आरोग्यनीती विशेष अंक स्वरूपात जाहिरात क्षेत्रातील नामांकित अग्रगण्य संस्था फॅटसी २१ च्या माध्यमातून उन्नती बागुल जगदाळे यांनी अनेक सुप्रसिद्ध लेखक, डॉक्टर, गायक, कलाकार, समाजसेवक यांचे सहकार्य घेत नितांत सुंदर, ओजस्वी आरोग्यनीती अतिशय शब्दशः कोरोना काळातील सर्वं संकटांवर विजय मिळवत अंधाराकडून प्रकाशा कडे जात एक आरोग्य दीपक आपल्या वाचकांच्या अंगणात आणला आहे.

अतिशय नाविन्यपूर्ण, वैविध्य अंकात आहे आणि प्रत्येक विषय, त्यातील आशय समृद्ध, प्रेरणादायी आहे. भारतात २०३० मध्ये हृदयरोगामुळे भयावह पद्धतीने २ कोटींपेक्षा जास्त मृत्यू झालेले असतील आणि यात ८० % समावेश मध्यमवर्गाचा असेल तेव्हा मग हृदयरोग कसा टाळावा ? काय काळजी घ्यावी ? आधुनिक सर्वसामान्यांच्या आवाक्यात असलेल्या उपचारां बाबत मार्गदर्शन करत अंक सुरू होतो आणि मग संपूर्ण अंकात एक घोडदौड सुरू होते.

कोरोना काळातील “फौजिया “कोविड सेंटर ची अतुलनीय कामगिरी अंकात आहे. भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या मुलाखती मध्ये अनोख्या पद्धतीने संगीत आणि आरोग्य उलघडत गेले आहे. तर स्वरचंद्रिका पदमजा फेणांनी जोगळेकर यांनी आवाज जोपासना मंत्र, तंत्र सुंदर पद्धतीने सांगितले आहे. योग आणि आरोग्य तसेच मनःशांती वर सुंदर लेख आहे. स्त्री आणि “मेनोपॉज” यातील मानसिक स्थिती असो की लहान मुलांचे आरोग्य लसीकरण आणि खास करून कोरोना काळातील काळजी याबाबत लेख आहे.

क्रिकेटपटूंनी सकारात्मकतेने विविध आजारांवर मिळवलेले यश तसेच देशी, विदेशी प्रादेशिक चित्रपट हा वेगळा विषय घेतला आहे. आणि विवाहित स्त्री चे प्रेमात पडणं एक मानसिक द्वंद्व चा चित्रपट अंक उभा करतो. कोरोना काळ आणि युवा पिढी यांचा बदललेला दृष्टीकोन, सोबतच समाज माध्यम (सोशियल मीडिया) यांच्या भूमिकेबाबत लेख आहे.

नाना पाटेकर, सयाजी शिंदे मकरंद अनासपुरे यांच्या सारखे दिगग्ज पासून तर इतर सर्वसामान्य व्यक्ती यांचा असामान्य, अतुलनीय प्रवास प्रयोग अंकात आहे. त्यात कृषी, सेंद्रिय शेती बाबत लेख आहे. आणि आधुनिक काळात वीजेचा वापर न करणारे मुंबई मधील एक व्यापारी कुटुंब यांचा संकल्प अंकात विशेष आहे. सिझेरियन समज-गैरसमज हा विषय असो नाहीतर ती आणि कॅन्सर सारखे विषय, कॅन्सर कसा टाळावा हे सर्वच विषय खुप सुंदर पध्दतीने हाताळले आहेत…

तसेच मन स्वास्थ्य साठी पर्यटन हे प्रभावी उपाय हृदयी वसंत फुलतांना ह्या लेखातून नितांत सुंदर कर्जत येथील प्रेक्षणीय ठिकाण वसंत हॉलिडेज फार्म ची ओळख वाचकांना होते. मराठी अंकात इंग्रजी लेख असे देखील वेगळेपण आरोग्यनीती यांनी केले असून नशा आणि युवा तसेच पाणी, आरोग्य सोबतच कोरोना च्या पुढील स्टेज साठी काय आणि कशी तयारी, दक्षता असावी? याबाबत अंक मार्गदर्शन करतो.

तसेच समाजात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यां बाबतीत चिंता आणि मार्गदर्शन करणारा लेख संपूर्ण डॉक्टर समाजाची (वैद्यकीय क्षेत्राची) व्यथा मांडत त्यावर उपाय सुचवत समर्पित केला गेला आहे आणि डॉक्टर – रुग्ण नाते कसं असावं ? हे देखील अंकात येतं. याशिवाय कथा, कविता देताना आरोग्य सूत्र कायम ठेवण्याचं आणि सर्व लेख आरोग्याबाबत असतील याची काळजी अंकात घेत अतिशय वाचनीय आणि संग्रही असावा अशा स्वरूपात आरोग्यनीती साकार झाला आहे. आणि यात अजून बरेच विषय आहेत.

सदर अंकातून प्राप्त होणारी सहयोगराशी समाजोपयोगी कार्य करण्यासाठी दान देत एक दीपक आपल्या परीने वाचकांच्या विश्वासाच्या परंपरेवर आरोग्यनीती प्रज्वलित करत आहे…अतिशय वाजवी दरात आरोग्यनीती चा सुबक अंक भेट देत आपण देखील आरोग्य दक्ष नागरिक बनत समाजसेवा करू शकतो आणि एक आरोग्य संपन्न समाज निर्माण करणारे दीपक (दिवा) बनू शकतो.

आरोग्यनीती…आरोग्यनीती अंकांचे प्रकाशन शुश्रूषा हॉस्पिटलचे डॉ. संजय तारलेकर आणि डॉ.सौ.अनिता तारलेकर यांच्या शुभहस्ते पार पडले. डाॕक्टर दांपत्यानी कोरोना काळात आरोग्यविषयक अंक आरोग्यनीती समाजासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरावा असाच आहे…अशी भावना व्यक्त केली. एका महिलेने कोरोना काळात अंक निर्मितीचे धाडस केले यासाठी संपादिकेचे विशेष कौतूक डाॕ. अनिता तारलेकर मॅडम यांनी केले .

अंक प्रकाशित करताना संपादिका उन्नती बागुल जगदाळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना विशेष आनंद व्यक्त करत वसुबारस च्या वेळी प्रकाशित झालेला आरोग्यनीती अंक एक सर्वोत्तम आरोग्य भेट ठरेल अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

आज वर निवेदिका म्हणून तुम्ही सर्वांनी मला भरभरून प्रेम, आदर दिला आहे… साहित्यक्षेत्रातला हा पहिला पुस्तकरूपी केलेला प्रपंच…ह्या अंक आरोग्यनीतीचा आनंदाने स्विकार करा…स्वागत करा… आरोग्यनीती घरोघरी म्हणत हा विशेष अंक वाचकांच्या गळयातला ताईत बनेल. हा अंक आपल्याकडे आला असेल अशी अपेक्षा व्यक्त करू या !! नक्कीच आपण हा अंक वाचाल ही अपेक्षा!! माझं कुटुंब…माझी जबाबदारी… आरोग्यनीतीचा दीप लावा घरोघरी…अंक घरपोच मागवण्यासाठी संपर्क उन्नती बागुल जगदाळे ७०२१४१४६९४.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here