सुरु झालेली माता महाकाली महोत्सवाची परंपरा याच भव्यतेसह अविरत सुरू राहिल – आ. किशोर जोरगेवार

0
385

सुरु झालेली माता महाकाली महोत्सवाची परंपरा याच भव्यतेसह अविरत सुरू राहिल – आ. किशोर जोरगेवार

999 कन्या भोजन आणि महाप्रसादाने महाकाली महोत्सवाची सांगता

माराष्ट्राला धार्मिक परंपरा लाभली आहे. राज्यातील प्रमुख धार्मीक स्थळी पालखी यात्रेची प्रथा आहे. मात्र आम्हाला ही पंरपरा सुरु करायला थोडा वेळ झाला याची नक्कीच खंत आहे. मात्र सुरु झालेली ही महोत्सवाची परंपरा आणि यात महाकाली भक्तांचा लाभलेला सहभाग उत्साह वाढवणारा आहे. या महोत्सवाची इतिहास नोंद घेईल. माता महाकालीची पालखी यात्रेची सुरवात झाली याचा आनंद आहे. सुरु झालेली ही माता महाकाली महोत्सवाची परंपरा याच भव्यतेसह किंबहून यापेक्षा अधिक भव्यतेत अविरत सुरु राहील असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

999 कन्याभोजन आणि महाप्रसादाने चार दिवसीय महाकाली महोत्सवाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी माता महाकाली सेवा समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, सदस्य बलराम डोडाणी, प्रा. श्याम हेडाऊ यांच्यासह माता महाकाली सेवा समीतीच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती. समारोपीय चौथ्या दिवशी माजी खासदार नरेशबाबु पुगलीया यांच्या हस्ते महोत्सव पेंडालात माता महाकाली मातेची आरती करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगवार, माजी नगर सेवक दिपक बेले, अशोक नागापूरे, गजानन गावंडे, अॅड. अविनाश ठावरी आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे आणि पोलिस अधिक्ष अरविंद साळवे यांनीही उपस्थिती दर्शवत माता महाकालीची आरती केली

समारोपीय कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर शहरातुन माता महाकाली ची पालखी निघावी अशी जुनी इच्छा होती. मात्र कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने या नियोजनाला थोडा विलंब झाला. अखेर यंदा हा महोत्सव घेण्याचा निर्धार केला. आणि माता महाकालीच्या कृपेने फक्त 16 दिवसात इतके भव्य आयोजन करता आले. यात अनेकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग लाभला आहे. त्या सर्वांचे आभारही मंचावरुन आमदार किशोर जोरगेवार यांनी मानले.

महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या श्री. माता महाकाली नगर प्रदक्षिणा पालखी शोभायात्रेत भक्तांनी दाखवेली लक्षवेधी उपस्थिती उत्साह, शक्ती, आत्मविश्वास वाढवणारी होती. यातुन पूढच्या वर्षी यापेक्षा भव्य आयोजन करण्याची उर्जा मिळाली आहे. केवळ महोत्सव आयोजन करुन आम्ही थांबणार नसुन माता महाकाली मंदिराचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्पही आम्ही केला आहे. मंदिराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने 75 कोटी रुपयांचा दुसरा टप्पा आपण उपलब्ध करुन देत आहोत. तर यात्रा पटांगणाचा विकास करत येण्या-या भाविकाच्या राहण्याची सोय व इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तिस-या टप्याच्या निधीची आपण मागणी करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. चार दिवस चाललेल्या या महोत्सवात आपण अनेक सुप्रसिध्द गायक, जागरणकार यांना आमंत्रीत केले. यातुन हा महोत्सव संपूर्ण राज्यभरात पोहचला आहे. महोत्सवात नागरिकांच्या उसळलेल्या अलोट गर्दी आणि मिळालेल्या सहकार्यामुळे महोत्सवाची उदिष्ट पूर्ती झाली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमात महोत्सवात सहकार्य करणा-र्या सर्व सस्थांचा, व्यक्तींचा महाकाली सेवा समीतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमा नंतर महोत्सव पेंडालात 999 कन्यांना भोजन देत त्यांना भेट वस्तु देण्यात आल्यात. त्यानंतर महाप्रसादाला सुरवात झाली. यावेळी असंख्य नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here