कुस्तीपटूंना मानधन वाटप

0
332

कुस्तीपटूंना मानधन वाटप

अनंता वायसे

एस. डी. ओ. कार्यालय, हिंगणघाट येथे वर्धा जिल्ह्यातील एकूण १८ कुस्तीपटूंना प्रत्येकी ६०००/- रुपये मानधन (खुराख भत्ता) देण्यात आले. त्यामध्ये हिंगणघाट तालुक्यातील १५ कुस्तीपटूंचा सहभाग होता. सदर कुस्तीपटूंचा मा. खासदार रामदासजी तडस, मा. आमदार समीरभाऊ कुणावार, उपजिल्हाधिकारी (एस. डी. वो) चंद्रभान खंडाईत, कुस्ती संघटना अध्यक्ष वर्धा जिल्हा श्री मदन जी चावरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. ललिता लेकुरवाळे,( माने मॅडम),क्रीडा अधिकारी अनिल निमगडे, भाजयुमो चे प्रदेश सचिव अंकुश ठाकूर यांनी कुस्ती पटुंचे स्वागत केले.
मा. खासदार रामदासजी तडस यांनी सर्व खेळाडूंना उत्साह, आत्मविश्वास, जिद्दीने, चिकाटीने कार्य करण्याचा सल्ला दिला. या वेळी मा.आमदार समीरभाऊ कुणावर यांनी आपल्या भाषणामध्ये सुचविले की, मी सुद्धा कुस्तीचा खेळाडू असल्याने हिंगणघाट मध्ये केसरी कुस्ती स्पर्धा घ्यावी. अशी मा. खासदार रामदासजी तडस साहेबांना विनंती केली. आपल्या हिंगणघाट व हिंगणघाट तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये असे १५ कुस्तीपटू आहे. या खेळाने चांगले करिअर करून जीवनाचा उद्धार होतो सोबतच शाळेचे नाव,आई वडिलांचे नाव, तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव लौकिक होते. ह्या सर्व तरुण मुलांकरिता हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण गावात व्यायाम शाळा व्हावी या करिता मी पूर्ण पणे प्रयत्न करील.
सर्व खेळाडूंना समोरील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सर्वांनी चांगले नाव लौकिक करा, चांगले राज्यस्तरावरील कुस्तीपटू तयार व्हा. अशा सर्वांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here