मंदा पडवेकर ‘इंटरनॅशनल ग्लोबल’ पुरस्काराने सन्मानित

0
596

मंदा पडवेकर ‘इंटरनॅशनल ग्लोबल’ पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूर : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेविका मंदा पडवेकर यांना गुजरातमधील के. जी. एन. हुमिनिटी सोशल सर्विस या संस्थेद्वारा इंटरनॅशनल ग्लोबल अवार्ड २०२१ व इंटरनॅशनल वूमन्स डे अचिव्हर अवार्ड २०२१ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
कोरोनाने थैमान घातले असून त्याच्या जनजागृतीसाठी मंदा पडवेकर प्रयत्न करीत आहेत. तसेच समाजातील दुबळ्या महिलांना मदत करणे, रोजगार उपलब्ध करून देणे, मुलींना घडविणे, बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमात सहभाग, महिला सक्षमीकरण मानस या त्यांच्या कार्याची दखल घेत मंदा पडवेकर यांना इंटरनॅशनल ग्लोबल अवार्ड २०२१ व इंटरनॅशनल वूमन्स डे अचिव्हर अवार्ड २०२१ हे दोन्ही पुरस्कार बहाल करण्यात आले. यापूर्वी ही त्यांना विविध संस्थांच्या मार्फत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तरी मंदा पडवेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here