आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे सन्मान गृहिणींचा कार्यक्रम थाटात संपन्न

0
450

आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फे सन्मान गृहिणींचा कार्यक्रम थाटात संपन्न

व्यवसाय सुरु करायला पैशाची गरज नसून इच्छा शक्ती ची गरज आहे – इंजि. दिलीप झाडे


चंद्रपूर : क्रांतिवीर शहीद बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांच्या जयंती तथा जागतिक महिला दिनानिमित्त आम आदमी पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे सन्मान गृहिणींचा कार्यक्रम बाबुपेठ येथिल के जी एन कॉन्व्हेन्ट येथे थाटात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आप चे जिल्हा अध्यक्ष सुनिल देवराव मुसळे, मुख्य वक्ते म्हणून सर्च फाउंडेशन चे संचालक इंजि. श्री. दिलीप झाडे सर तर विशेष अतिथी म्हणून वनिता आहार चे मॅनेजर जावेद सर, टच अँड ग्लो अकॅडमी चे संचालिका सौ प्रीती ताई चव्हाण, शुभम फायनान्स चे कु. दिव्या मेश्राम, मंजुषा दरवडे आप चे युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, आप संघटन मंत्री नागेश्वर गंडलेवार सर, शहर अध्यक्ष योगेश गोखरे, यांची उपस्थिती होती.

यावेळेस जिल्हा अध्यक्ष मुसळे यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या देशात महागाईने हडकंप माजलेला असून इंधना पासून ते खाद्य तेल, गॅस, फळे, भाज्या, अश्या अनेक जीवनावश्यक वस्तूच्या किंमती दिवसेंन दिवस झपाट्याने वाढत असल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झालेले आहे. अशा वेळेत घरातील प्रमुख व्यक्तीचा डोक्यावरील भार कमी करण्याकरिता गृहिणींना हात भार लावणे गरजेचे झाले आहे. महिलामध्ये उद्योग तसेच व्यवसायाबद्दल जागॄती निर्माण
व्हावी हा कार्यक्रमाचा उद्देश. त्यानंतर प्रमुख वक्ते दिलीप झाडे सर यांनी व्यवसाय सुरु करायला पैशाची गरज नसून इच्छा शक्ती ची गरज आहे. गरीब तो असतो ज्याला हाथ आणि पाय नाही असे मत व्यक्त करत उपस्थित महिलांना मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यावेळेला उपस्थित मान्यवरांचे हस्ते बाबुपेठ येथील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सन्मानित श्री. हर्षल नेवलकर, जगूया थोडसं माणुसकीसाठी फाउंडेशन चे अध्यक्ष कार्तिक बल्लावार, वर्ष 2007 पासून शहरात ऑटो व्यवसाय करणारी महिला श्रीमती अल्का ताई कुसडे, यांना प्रोत्साहन प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच कोविड काळात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या आणि गरोदर महिलांचा सेवेत तत्पर असणाऱ्या आशा वर्कर यांना सन कोट आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

तर आभारप्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक आप चे शहर सचिव राजु कुडे यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता बाबुपेठ महिला अध्यक्षा सौ. सुजाता ताई बोदेले, आरती ताई आगलावे, सिकंदर सागोरे, सुनील सदभैय्या, राजू भाऊ तोडासे, सागर बोबडे, अनुप तेलतुंबडे,जितेंद्र भाटिया,सुधिर
पाटील, अशोक अंबागडे, अजय बाथव, स्वप्नील बांदोडकर, पाटील, दीपक चूनारकर, कृष्णा सहारे, जयदेव देवगडे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला असंख्य महिला वर्ग उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here