घुग्घुस शहरातील वेकोलिच्या मोठया तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करा – विवेक बोढे

0
197

घुग्घुस शहरातील वेकोलिच्या मोठया तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करा – विवेक बोढे

 

 

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी 

 

घुग्घुस शहरातील वेकोलिच्या मोठया तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करा अशी मागणी माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केली आहे.

 

जिओसी बंकरच्या बाजूला वेकोलिचा मोठा तलाव आहे. हा तलाव वेकोलि व शहरासाठी पाण्याचा मोठा स्रोत आहे. वेकोलिच्या ओव्हर बर्डनमुळे हा तलाव उथळ झाला आहे. ओबी मुळे तलावाचा आकार लहान झाला आहे.

 

अगोदर कोळी समाज बांधव या तलावात मोठ्या प्रमाणावर मासेमारी करायचे परंतु तलावाचे पाणी घाण झाल्याने मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. कोळी समाज बांधवांसमोर उपजीविकेची मोठी समस्या उत्पन्न झाली आहे.

 

वणी क्षेत्राचे महाप्रबंधक उदय कावळे असतांना तलावाचे खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. थोडेफार कामही झाले परंतु अवकाळी पावसामुळे काम बंद पडले. तलावाचे खोलीकरण केल्यास पाण्याची पातडी वाढणार आहे त्यातून कोळी बांधवांना रोजगार मिळणार आहे.

 

हि समस्या लक्षात घेत कोळी बांधवांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेतली व आपल्या समस्या सांगितली.

 

त्याअनुषंगाने भाजयुमो विवेक बोढे यांनी कोळी बांधवांसह न.प.कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली व चर्चा केली आणि निवेदन देऊन मागणी केली.

 

यावेळी माजी सरपंच संतोष नुने, सिनू इसारप, मल्लेश बल्ला, अमोल नागपुरे, दिपक कामतवार, मारोती मांढरे, सचिन कोंडावार, हेमंत पाझारे, किसन कामतवार, वसंता कामतवार, संदीप कामतवार, मारोती बोरवार, अंकुश कामतवार, बंडू शिवरकर, संतोष कामतवार, मंगेश नागपुरे, शंकर कामतवार, वाल्मिक मांढरे, राजू मांढरे, राकेश कामतवार, आशिष कामतवार, राहुल मांढरे, सुनील मांढरे, दिलीप मांढरे, नागेश्वर नागपुरे, गणेश कामतवार, परमेश्वर कामतवार, गणेश नागपुरे, आकाश कामतवार, नंदकिशोर कामतवार, कार्तिक नागपुरे व मोठया संख्येत समाज बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here