मनपा व रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन तर्फे महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान

0
380

मनपा व रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन तर्फे महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान

चंद्रपूर : येथील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय परिसरात चंद्रपूर शहर मनपा व रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन तर्फे परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालयाच्या आवारात नागरिकांकडून कचरा टाकण्याचे
प्रकार सुरू आहेत. शहराला स्वच्छता सर्वेक्षण या स्पर्धेमध्ये थ्री स्टार मिळाले असली तरी स्थानिक नागरिकांकडून महाविद्यालयाच्या आवारात कचरा टाकला जात आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांवर स्वच्छतेचे संस्कार होण्याची गरज एकीकडे व्यक्त होताना तसेच दुसरीकडे महाविद्यालयाच्या परिसरात नागरिकांकडून टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. घरातील खरकटे व शीळे अन्न, मृत जनावरे व प्लास्टिक कचरा येथे नागरिकांकडून टाकण्यात येत आहे. तसेच या परिसरात पहाटे नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यायामा करिता व शुद्ध हवा घेण्याकरिता येतात.
अशातच रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन अध्यक्ष राहुल कोटकर यांनी स्वच्छता विभाग येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल शेळके यांची भेट घेऊन स्वच्छता मोहिमेबद्दल चर्चा केली व परिसर संयुक्त श्रमदानाने स्वच्छता
करण्याचे ठरविले.
रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन व चंद्रपूर शहर महानगर पालिकेतील स्वच्छता मित्र व काही अधिकारी मिळून महाविद्यालयातील परिसर स्वच्छ करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश लेनगुरे यांनी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण सप्ताह बद्दल व स्वच्छतेची सुरुवात आपल्या घरापासूनच केली पाहिजे असे मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे संतोष गर्गेलवार यांनी स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा या मोहिमेबद्दल उपस्थितांना माहिती दिली. या उपक्रमास डॉ. अमोल शेळके, संतोष गर्गेलवार, डॅनिश पठाण, सुहास थोरात, आकाश नागपुरे, बंटी बिर्या, पूजा भुसारी, पुनम भुसारी उपस्थित होते.
तसेच रक्षण धरणीमाते चे फाउंडेशन तर्फे राहुल कोटकर, अविनाश लेनगुरे, राजीव शेंडे, सुरज हजारे, हरप्रीत सिंग, माधुरी शेंडे, रश्मी कोटकर, शाम गोहणे, आशिष भरडकर, मृणाल वडगावकर, गौरव वरारकर, मयुर उरीते, नागेश
उमाले, विशाल पेंदोर, मृणालीनी नळे, सोनाली दुबे, आरुष लेंनगुरे व योगिनी बोरीकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here