विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्याबद्दल निषेध!

0
868

विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्याबद्दल निषेध!

चिमूर (चंद्रपूर) विदर्भ, किरण घाटे : “दारूबंदी” हा लोकहिताचा निर्णय होता. यामुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसला होता. तसेच घरा-घरांमध्ये जो कौटुंबिक कलह वाढला होता तोही बर्‍या प्रमाणात कमी झाला होता. स्त्रियांवर होणा-या अत्याचाराचे प्रमाण देखील या दारूबंदी काळात कमी झाले होते. आता दारूबंदी उठवल्यामुळे घराघरात कुटुंबव्यवस्था व कुटुंबातील अर्थ नियोजन पुन्हा कोलमडेल. आधीच कोरोना महामारीमुळे सामान्य जनता त्रस्त असताना त्यांच्या आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून हा दारूबंदीचा निर्बंध उठवणे म्हणजे राज्य सरकारची अागतिकता ठरलेली आहे. दारूबंदी हटवून दारू सम्राटांसमोर सरकारने लोटांगण घातलेे असेच यावरून सिद्ध होते.

मागच्या राज्य सरकारने लोकहिताचा विचार करून या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली होती. नवीन राज्य सरकारनी यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कठोर कारवाई न करता दारूबंदीचा निर्णय हटविणे या जिल्ह्याचे दुर्भाग्यच आहे. दरम्यान आज झालेल्या या निर्णयाचा आ. किर्तीकुमार (बंटी) भांगडीया यांनी कडाडून विरोध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here