सद्गुरु श्री गुंडामहाराज उदगीरकर संस्थान पंढरपुर, शाखा:-उदगीर , नांदेड , श्रीरामपूरच्या वतीने

0
484

तालुका प्रतिनिधी उदगीर/✍🏻बाबूराव बोरोळे

मो.9823781042

 

लातूर उदगीर :- बुद्ध पौर्णिमा बुधवार रोजी सिद्धसिंहासन पीठाधीश श्रीगुरु गुंडा महाराज सिद्धरस उदगीरकर यांनी उदगीर उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार व्ही. डी., डॉ. एस. एस. देशपांडे यांना संपर्क केला असता रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण आणि नातेवाईकांचे शुद्ध आणि थंड पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर ची गरज आहे असे समजले..

उभय डॉक्टरांच्या मागणी प्रमाणे श्री.गुरु गुंडा महाराज उदगीरकर यांनी रुग्णांसाठी तात्काळ उपयोगी ठरणाऱ्या अंदाजे 60000/- रुपये किमतीचे वॉटर कुलर ची मदत देवु केली आहे.

सदरच्या वस्तुंची मदत ही ह.भ.प. चक्रीनाथ गुंडा महाराज सिद्धरस (उदगीरकर) यांचे हस्ते उदगीर उपजिल्हा रुग्णालयात ऑनलाईन उपस्थित राहून करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी उदगीर उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवार व्ही डी, डॉ. देशपांडे एस. एस, डॉ आरडाले एम. एम, प्रमोद पारसेवार, सुभाष चिद्रेवार, सुशील पेन्सलवार, योगेश बोथिकर, कुमार बोथिकर, सुदेश मुक्कावार, प्रसाद पारसेवार, नाथा कोटलवार, खंडू कोटलवार, अमित मुक्कावार, श्रीनिवास रायचुरकर, सुशील (गजू)पेन्सलवार, नारायण चिद्रेवार, सचिन मुक्कावार, जितू मुक्कावार व लातूर उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी, ऑफिस स्टाफ, असे सर्वजण उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये, वैद्यकीय अधिकारी डॉ पवार, डॉ देशपांडे, यांनी आपले मनोगत मांडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here