मोहर्ली येथे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करणे.

0
467

मोहर्ली येथे जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करणे.

*चंद्रपूर* :आज  दिनांक ०२/०८/२०२१ ला महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत समाविष्ट ग्रामपंचायत मोहर्ली येथील अंगणवाडी क्रमांक 2 येथे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त सौजन्याने जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त स्तनपान व पूरक आहार विषयी गावातील स्तनदा व गर्भवती मातांना तसेच इतर महिला व किशोरवयीन मुलींना स्तनपानाचे महत्त्व व पूरक आहाराचे महत्व पटवून सांगण्यात आले.

1) पूरक आहार म्हणजे काय?

2) त्यात कोणत्या बाबीचा समावेश असावा?

3) पूरक आहार केव्हा चालू करावा?

4) प्रमाण व घनता कशी असावी?                            सक्षम पालक सक्षम बाळ, होण्यासाठी जागतिक स्तनपान करने खूप गरजेचे आहे .या सर्व प्रश्नांवर निरसन व चर्चा करण्यात आले व सदर कार्यक्रमात पूरक आहाराबाबतची माहिती अंगणवाडी सेविका शेंडे मॅडम यांनी दिली.स्तनदा व गर्भवती मातांना पूरक आहाराबाबत  व कोरोना काळात घेण्यात येणाऱ्या काळजी बाबत  व्हिडिओ च्या माध्यमातून सविस्तर महिती दिली. व स्तनपानाच्या योग्य पद्धती सांगण्यात आल्या. यावेळी गावातील स्तनदा व गर्भवती माता, तसेच इतर महिला व किशोरवयीन मुली, अंगणवाडी  सेविका,शेंडे मॅडम ,,रोशन दुर्गे तालुका समन्वयक (VSTF) ,आशा वर्कर इत्यादि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here