अन्नपुरवठा विभागाचा गलथान कारभार ‘आंधळ दळतं अन कुत्र पीठ खातं’

116

अन्नपुरवठा विभागाचा गलथान कारभार ‘आंधळ दळतं अन कुत्र पीठ खातं’

अन्नपुरवठा मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा व राशन दुकानदाराचा परवाना रद्द करावा – आम आदमी पार्टीची महिला अध्यक्ष ॲड. सुनिता पाटील यांची मागणी…


आम आदमी पार्टी चंद्रपूर अध्यक्ष ऍड सुनीता पाटील यांच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या गोरगरीब जनतेचे धान्यावर डल्ला मारणाऱ्या दुकानदारावर व त्या दुकानदाराला शह देणाऱ्या अन्नपुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी अन्न पुरवठा विभागातील भ्रष्ठ अधिकारी तसेच भ्रष्ठ राशन दुकानदारांवर चौकशीचे आदेश पारीत करुन दोषीवर कारवाई करुन भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करुन भ्रष्ट राशन दुकानदारांवर कारवाई करुन त्यांना राशन दुकान चालविण्याचा देण्यात आलेला परवाना रद्द करणेबाबत निवेदन देण्यात आले आहे.

गेल्या कही दिवसांपासुन “आम आदमी पार्टी जन प्रतिनिधी कार्यालयात” गरीब महिला व कुटूंबांनी येऊन त्यांना मिळत असलेल्या राशनबाबत तक्रारी केल्या. जनतेचे म्हणणे आहे .की, त्यांचे कार्ड अंत्योदय योजने अंतर्गत येत आहे. परंतु अंत्योदय योजने अंतर्गत त्यांना राशन वितरीत करण्यात आलेले नाही. आणि त्यांना राशनमध्ये साखरेचे वितरण कधीही करण्यात आलेले नाही. अंत्योदय योजनेअंतर्गत एक राशन कार्डावर ३५ किलो धान्य देणे हे बंधनकारक आहे परंतू लोकांनी सांगितले की. त्यांना कोणाला पाच किलो, कोणाला दहा किलो असे धान्य देण्यात येत आहे. राशन घेतल्याचे बिल (पावती) सुध्दा ग्राहकांना देण्यात येत नाही. मग बाकीचे राशन कुठे जात आहे. आणि ज्यांचे कार्ड अंत्योदय कार्डमध्ये बदलले याबाबत ग्राहकांना काहीच माहीत नाही. आणि अशा प्रकारची माहीती ग्राहकांना परवाना धारकांनी (दुकानदारांनी) देण्यात आलेली नाही. शासनाकडून आलेले धान्य किती आले आणि किती वाटप झाले याबाबत कोणताही हिशेब ठेवण्यात येत नाही.

राशन धारकांच्या तक्रारी आल्यानंतर आम आदमी पार्टी संघटना व माझ्या पदाधिकाऱ्यांनी सत्य जाणून घेण्याचे प्रयत्न केले तेंव्हा असे निदर्शनात आले की गरिबांना मिळणारे धान्य हे काळ्या बाजारात विकले जात असावे राशन वाटपामध्ये वरिष्ठांपासून तर वितरका पर्यंत बेरच घोटाळे झाल्याचे दिसत आहे. तरी जनतेच्या हितासाठी व त्याचे प्रश्न सोडविण्याकरीता उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी व गोर गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी मा. जिल्हाधिकारी, चंद्रपूर, मा. पोलीस अधीक्षक चंद्रपूर, मा. अन्न पुरवठा विभाग चंद्रपूर यांना आम आदमी पार्टीच्या अँड. सुनीता पाटील महिला अध्यक्ष, चंद्रपूर जस्मिन शेख, रुपाली काटकर, सुहाना दुर्योधन आणि सर्व पदाधिकारी उपस्थित माननीय जिल्हा अधिकारी चंद्रपूर व माननीय पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले आहे तरी गोरगरिब धान्यावर डल्ला मारणाऱ्या त्या भ्रष्ट अधिकारी व राशन दुकानदारावर त्वरित कार्यवाही व्हावी असे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आले आहे.

advt