प्रा. विमलताई गाडेकर यांचे साहित्य समाजात जागृती निर्माण करणारे – आ. किशोर जोरगेवार

0
344

प्रा. विमलताई गाडेकर यांचे साहित्य समाजात जागृती निर्माण करणारे – आ. किशोर जोरगेवार

प्रा. विमल गाडेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 

प्रा. विमलाताई गाडेकर यांनी आपल्या काव्य रचनेतून समाजात जागृतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चंद्रपूर सह विदर्भातील सामाजिक आणि साहित्यक चळवळीत त्यांचा महत्वाचा वाटा होता. आपल्या सामाजिक चळवळीतून त्यांनी अनेक कुटंबांना उभे केले. त्यांचे साहित्य समाजात जागृती निर्माण करणारे असून त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून त्यांचे विचार नेहमी समाजा पर्यंत पोहचत राहिल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

चंद्रपूरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व कवीयत्री प्रा. विमल गाडेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज शनिवारी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात विमल दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भगवान गाडेकर, बबन सराडकर, डॉ. वामन रामटेके, डॉ. प्रतिभा वाघमारे, डॉ. रजनी हजारे, डॉ. शरदचंद्र सालफळे आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलतांना आ जोरगेवार म्हणाले कि, प्रा. विमलताई गाडेकर यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्या आंबेडकरी विचारांनी प्रेरित होत्या. यातूनच त्यांनी महिला अत्याचारा विरोधात लढा उभारला आपल्या काव्य रचनेतून त्यांनी महिलांमध्ये जागृती निर्माण केली. परितक्त महिलांचे पूनरर्वसन करण्यासाठी त्यांनी संयुक्त महिला मंचाची स्थापणा केली. या मंचाच्या माध्यमातून महिला अत्याचारा विरोधात आवाज उचलून महिलांना न्याय मिळवून दिला. त्याच्या या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पूरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्या समाजाच्या उध्दाराकरिता चंदना सारख्याच झिजल्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी समाजाला चंदनासारखेच सुहासित केले. त्यांचा संपादित साहित्य संग्रह त्यांच्या कार्याला उजाळा देत राहिल असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, हे कार्य करत असतांना प्रा. विमलताई यांना परिवारिकही सहकार्य लाभले. परिवाराची जबाबदारी यशस्वीरित्या पेलत समाजाने आदर्श घ्यावे असे काम त्यांनी केले. चंद्रपूरची लेक इतक्या मोठ्या स्थानी पोहचने ही बाब अभिमानास्पद आहे. त्यांचे कार्य न पूसणारे असून ते युवा पिढी पर्यंत पोहचविण्याची मोठी जबाबदारी समाजावर असल्याचे ते यावेळी म्हणाले. प्रा. विमलताई गाडेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन त्यांना अभिवादन करत कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमाला महिला व युवकांची लक्षणीय उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here