कोरोना जनजागृती काव्यधारा – ११

0
453

कोरोना जनजागृती काव्यधारा – ११

कवी – सुनिल शामराव पोटे, दिघोरी

 

कविता : या चला हो कोरोनाला मात देऊ

मानवाची जात चिवट लढणारी
कठीण प्रसंगी न मागे हटणारी
विश्वास ठेवा पक्का मनात मित्रहो
परतून लावू कोविडची महामारी
संयमाने वागण्याची सवय लावू
या चला हो कोरोनाला मात देऊ ।

तोंडावर मास्क नेहमी लावायचा
गर्दीचं ठिकाण सदाच टाळायचा
साबनाने हात वारंवार धुवायचा
नियम काटेकोर प्रत्येकाने पाळायचा
सकस अन्न दररोज न चुकता खाऊ
या चला हो कोरोनाला मात देऊ ।

माझे कुटुंब माझी जबाबदारी
शासनाचा उपक्रम आहे भारी
आरोग्य पथक फिरेल घरोघरी
तपासणी करु माहिती देऊ खरी
कठीण काळात शासनाच्या मदतीस धावू
या चला हो कोरोनाला मात देऊ ।

दूर सारु शंका बिनकामी भिती
देशसेवेची संधी आपल्या हाती
शासन झटतोय येथे लोककल्याणासाठी
पेटवा मनातल्या विझलेल्या वाती
अंधाराला सारणारी या प्रभात होऊ
या चला हो कोरोनाला मात देऊ ।

 

कवी : सुनिल शामराव पोटे
मु.पो. दिघोरी, ता. पोंभुर्णा
संपर्क – ९४०५५०३८३८३

 

(महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेला सहाय्य म्हणून फिनिक्स साहित्य मंच द्वारा सदर विषयावर ऑनलाईन कविसंमेलन पार पडले. यात सहभागी कविंच्या कोव्हीड-१९ बाबत जनजागृतीपर कविता आम्ही आपणास देत आहोत.)

•••••

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here