समिरभाऊ कुणावार यांच्या आमदार निधीअंतर्गत समाज भवनाचे लोकार्पण

0
432

समिरभाऊ कुणावार यांच्या आमदार निधीअंतर्गत समाज भवनाचे लोकार्पण

अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी

मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या विशेष निधी अंतर्गत भीमनगर वार्ड प्रभाग क्रमांक १ मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाज भवन व विठ्ठलमंदिर वार्ड प्रभाग क्रमांक २ हिंगणघाट येथे समाज भवनाचे लोकार्पण मा. कार्यसम्राट आ. समीरभाऊ कुणावार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
भीमनगर वार्ड प्रभाग क्रमांक १ व विठ्ठलमंदिर वार्ड प्रभाग क्रमांक २ हिंगणघाट येथील नीवासी यांची समाज भवनाची मागणी अनेक वर्षापासून होती या समाज भवनाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेचे छोटेमोठे कार्यक्रम या समाज भवनामध्ये व्हावे तसेच गावातील तरुण युवक-युवती त्यांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण शिबिर तसेच व्यक्तिमत्व विकास शिबीर यासारखे कार्यक्रम या समाज भवनामध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून एक हक्काची जागा व्हावी हे भीमनगर वार्ड प्रभाग क्रमांक १ व विठ्ठलमंदिर वार्ड प्रभाग क्रमांक २ हिंगणघाट येथील निवासी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांनी हे नागरिकांचे स्वप्न पूर्ण केले. या भवनांमुळे भीमनगर वार्ड प्रभाग क्रमांक १ व विठ्ठल मंदिर वार्ड प्रभाग क्रमांक २ या वार्ड ला विकासात्मक दृष्टी लाभल्यामुळे आज अनेक वर्षापासून असणारी ही मागणी पूर्ण झाल्याने या गोष्टीचा सर्व वार्डातील निवासी यांनी आनंद व्यक्त केला समाज भवन हे कुठल्याही एका समाजासाठी तयार केलेली वस्तू नसून समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांकरिता तयार झालेली ही वास्तू आहे. ही विशेषता जोपासण्याचे काम सुद्धा या समाज भवनाच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here