चंद्रपूर जिल्ह्यातील, राजुरा तालुक्यातील पंकज गाडे यांना अभिनयाच्या क्षेत्रात कलाकार म्हणून चंद्रपूर भुषण पुरस्कार जाहीर…

0
567

चंद्रपूर जिल्ह्यातील, राजुरा तालुक्यातील पंकज गाडे यांना अभिनयाच्या क्षेत्रात कलाकार म्हणून चंद्रपूर भुषण पुरस्कार जाहीर…

सन्मान जिल्ह्याचा, सन्मान कर्तृत्वाचा!! महाराष्ट्र गोवा, जिल्हास्तरीय सन्मान सोहळा अन्ना भाऊ साठे सभागृह पुणे येथे पार पडला.

राजुरा: महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील कर्तृत्वाचा, विविध क्षेत्रात सन्मान सोहळा साजरा करण्यात आला. नवनाथाची गैरवगाथा, संत गजानन शेगावीचे, विठू माउली सन मराठी वरील मालिका या टीव्ही मालिकांमध्ये राजुरा येथील पंकज गाडे यांनी काम केले. आपल्या अभिनयाची छाप पाडली. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पंकज गाडे कलाकार क्षेत्रात कलाकार म्हणून यांना चंद्रपूर भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.

“मी फक्त काॅलेज मध्ये एकपात्री नाटक करून मला अभिनयाची आवड निर्माण झाली. असे करता-करता मी स्वतः 2 वर्ष मागे उभे राहून मालिका मध्ये काम करत होतो. नंतर 3 वर्षानंतर इतका आत्मविश्वास वाढला की, मला महेश कोठारे प्रोडक्शन मध्ये प्रसिध्द मालिका ”जय मल्हार” 2014 मध्ये काम मिळाले व त्याच वेळी त्याच प्रोडक्शन च्या दुसऱ्या मराठी मालिका ”गणपती बाप्पा मोरया” मध्ये गुरूदेव चार शिष्या म्हणून काम मिळाले. व माझं काम बघून मला मुख्य भूमिका देण्यात आली. काही महिन्यांनंतर त्याच प्रोडक्शन मध्ये गावातील गावकरी मुख्य भूमिका बजावली होती. 10 शुटिंग चालू होते. परत “बाळुमामाच्या नावानं चांगभलं” मध्ये समोर काम करनार आहे” असे मत पंकज गाडे यांनी impact24news शी बोलताना व्यक्त केले.

त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील सुपुत्राच्या यशाचे कौतुक व अभिनंदन सर्व स्तरातून केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here