बाखर्डी जवळील भीषण अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

277

बाखर्डी जवळील भीषण अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू

कोरपना/प्रतिनिधी : कढोली खुर्द येथील गायत्री रवींद्र बोन्डे हिचा दुचाकी अपघातात दुर्दैवी अंत झाला. बाखर्डी जवळ आज 18 डिसेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. नातलग मुलीच्या साक्षगंधाकरिता ती बाखर्डी येथे गेली होती. दरम्यान त्या मुलीसह ती गडचांदूरकडे बाईकने निघाली होती. दरम्यान कारने बाईकला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर साक्षगंध जिचा होता ती मुलगी आणि दुचाकी चालक गंभीर जखमी झाले. गायत्री ही महात्मा गांघी कनिष्ठ महाविद्यालयाची बारावीची विद्यार्थिनी होती. विविध उपक्रमात तिचा सक्रिय सहभाग असायचा. गायत्रीच्या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

advt