शेतकरी आंदोलनाचे समर्थनार्थ उद्या ‘राजूर बंद’ चे आयोजन

0
551

शेतकरी आंदोलनाचे समर्थनार्थ उद्या ‘राजूर बंद’ चे आयोजन

भाजप सरकारच्या जनविरोधी व देशविकाऊ धोरणाविरोधात देशव्यापी बंद

 

वणी (यवतमाळ), मनोज नवले
खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने गेल्या ७ वर्षाच्या कार्यकाळात तडकाफडकी केलेली नोट बंदी, जीएसटी व लॉक डाऊन मुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आणली. दुसरीकडे शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे, कामगारांचे अधिकार कमी करणारे नवीन श्रमसंहिता, खाजगीकरण करणारे वीज दुरुस्ती विधेयक, त्यात भरीसभर जनतेच्या मालकीचे सर्वच सार्वजनिक उद्योग भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचे धोरण घेणे, डिझेल-पेट्रोलच्या महागाईच्या नावाने खुली लूट, गरिबांना न परवडणारे गगनाला भिडणारे गॅसचे भाव ज्यामुळे देशात सामान्य जनतेला प्रचंड मनस्ताप भोगावा लागत आहे, बेरोजगारी कधी नव्हती वाढली असल्याने देशात शेतकरी, कामगार, युवक, विद्यार्थी व महिला सतत आंदोलनरत आहेत. ह्याच प्रश्नांना घेऊन गेल्या १० महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत २७ सप्टेंबर ला देशव्यापी बंद होत आहे. त्याला समर्थन करीत राजूर येथेही राजूर बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी राजूर ग्रामपंचायत सभागृहात माजी पं स सदस्य अशोकभाऊ वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंद ला समर्थन करीत राजूर बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने आज दिनांक २६ सप्टेंबर ला गावात फिरून समस्त व्यापारी व दुकानदारांना आवाहन करीत राजूर बंद मध्ये सहभागी होण्याची विनंती करण्यात आली. त्यात सर्वांनी स्वयंस्फूर्तीने बंद मध्ये सहभाग घेत आपली प्रतिष्ठाने बंद करीत असल्याचे सांगितले.

 

यावेळेस मो. असलम, कुमार मोहरमपुरी, साजिद खान, जयंत कोयरे, अश्फाक अली, राजू पुडके, नंदकिशोर लोहकरे, सुशील आडकीने, रायभान उईके, सुनील कुंभेकर, विनोद बलकी, ऍड हरिदास तेलतुंबडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here