वणी ते कोरपना रस्त्याची झाली दुरावस्था

0
489

वणी ते कोरपना रस्त्याची झाली दुरावस्था

 

वणी (यवतमाळ), मनोज नवले
चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वणी कोरपना रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. चारगाव ते कोरपना असा 20 किलोमीटरचा रस्ता आहे, तरीपन स्वांतञ्याच्या सत्तर वर्षा नंतरही रस्ता मरणयातना भोगत आहे. या रस्त्याचे खडीकरण किंवा डांबरीकरण झाले नाही रस्ता तयार झाला तेव्हापासुन अजूनही या रस्त्याची साधी डागडुगी सुद्धा झाली नाही. याच मार्गांवर खदान असल्याने या मार्गानी अनेक जड वाहने जात असतात.मात्र याकडे लोक प्रतिनिधिंच लक्ष नसल्यामुळे या मार्गानी ये जा करणाऱ्या वाहन धारकांना मरण यातना सहन कराव्या लागते. याच मार्गांवर अनेकांचे जीवही गेले मात्र याकडे लोकप्रतिनीधिंचे लक्षच नाही असे ये जा करणाऱ्या वाहनधारकांकडून बोलल्या जात आहे.हा मार्ग चंद्रपूर जिल्हा व तेलंगणा राज्याला जोडणारा असल्याने तेलंगणा राज्यामधील नागरिक वणी येथे कामानिमित्य येत असतात.या मार्गकडे लक्ष देणारे लोकप्रतिनिधी हरवले कि काय असा नागरिकांमधून सूर बघायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here