लोकमान्य टिळक महाविद्यालयात “रा.से.यो.” स्थापना दिवस साजरा

0
683

लोकमान्य टिळक महाविद्यालयात “रा.से.यो.” स्थापना दिवस साजरा

 

 

वणी (यवतमाळ), मनोज नवले
शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचलित, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आज दिनांक 24 सप्टेंबर 2021 ला 3:00 वाजता राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त आभासी झूम ॲपच्या माध्यमातून व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे सर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. नीलिमा दवणे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याविषयी माहिती दिली आणि प्रमुख वक्त्यांचा परिचय त्यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. पि. आर. राजपूत सर होते. त्यांनी “Covid-19 च्या काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे योगदान व भूमिका” या विषया वर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

 

 

यांनी मार्गदर्शनात वेगवेगळ्या कालावधीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम सांगितले आणि राष्ट्रीय सेवा योजना निर्मितीच्या पाठीमागचा उद्देश आणि कोरोना कालावधीत स्वयंसेवकांनी देव-देवतांची भूमिका निभावली व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडे समाज अपेक्षेने पाहतो. म्हणून विद्यार्थ्यांनी आपण संत गाडगे बाबा चे पाईक आहोत म्हणून सध्य कालावधीत covid-19 लसी विषयी समाजामध्ये जाणीव जागृती निर्माण करावी व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कार्य करावे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा पुस्तका पुरता मर्यादित नसावा, समाजोपयोगी असावा आणि त्यातून समाजातील अंधश्रद्धा दूर व्हावी अंधाराची भीती घालवण्यासाठी स्वयंसेवकांनी कार्य करावे. आपण विज्ञाननिष्ठ असलो तरच तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही. आतापर्यंत पुरुषांनी स्त्रियांचे दमन केले कारण म्हणजे पुरुषांमधील न्यूनगंडाच्या भावनेमुळे म्हणून स्त्रीमध्ये पुरूषातील न्यूनगंडाची भावना दूर करण्याची क्षमता आहे. विशेषता मुलींनी पुरुषांमधील न्यूनगंड दूर करावा मत त्यांनी मांडले. आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष होऊन सुद्धा आपण जाती, धर्म या आधारावर समाजात तेढ निर्माण करत असेल तर आपण माणूस म्हणून जगत नाही. आपण राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तेव्हाच होऊ आपल्या घराजवळ चा परिसर आणि आपण स्वतः स्वच्छ असो तेव्हाच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ठरतो असे विचार मांडले.

 

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रसाद खानझोडे (प्राचार्य लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी) भूषवले. त्यांनीही राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार प्रा. किशन घोगरे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम अधिकारी: प्रा. डॉ. नीलिमा दवणे व प्रा.किशन घोगरे केले व तांत्रिक सहकार्य प्रा.डॉ. गुलशन कुथे (ग्रंथपाल) यांनी केले आणि या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here