भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते राष्ट्रीय कवी संमेलनाचे उद्घाटन !

0
393

भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते राष्ट्रीय कवी संमेलनाचे उद्घाटन !
किरण घाटे

मुंबई

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘ मराठी साहित्य वार्ता’ यूट्यूब चैनेलवर दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता ख्यातनाम कवि ज.वि. पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कवी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन केले असून उद्घाटन भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे.

या वेळी ख्यातनाम हिंदी साहित्यिक डाॅ.कालीचरण स्नेही , प्रसिद्ध लेखिका डाॅ.सुशीला टाकभौरे ,मराठी – हिंदी साहित्यिक प्रा. दामोदर मोरे, कवी अरुण म्हात्रे हे आपले विचार व्यक्त करणार आहे याच वेळी बाबासाहेबांना काव्याभिवादनही करणार आहेत.सदरहु कार्यक्रमास बहुसंखेने उपस्थित राहण्याचे आवाहन ‘ मराठी साहित्य वार्ता’चे प्रमुख अमरदीप वानखेडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here