घुग्गुस शहर युवासेनेत असंख्य युवकांचा पक्षप्रवेश

0
419

घुग्गुस शहर युवासेनेत असंख्य युवकांचा पक्षप्रवेश

 

माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख मा.आ.आदित्य ठाकरे साहेब तसेच युवासेना सचिव वरून सरदेसाईजी ,चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपजी गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली घुग्घूस युवासेना शहरप्रमुख चेतन बोबडे यांच्या नेतृत्वाखाली घुग्घूस येथे युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश करित भगवा झेंडा हातात घेतला. या पक्षप्रवेश व बैठक आढावा कार्यक्रम युवासेना पुर्व विदर्भ विभागीय सचिव हर्षलजी काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत प्रवेश कार्यक्रम पार पडला.

यावेळी नवनियुक्त युवासेना जिल्हा युवा अधिकारी विक्रांत सहारेजी यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात हर्षलजी काकडे यांनी युवकांचे पक्षात स्वागत करून उपस्थितांना शिवसेना पक्षाच्या ८० टक्के समाजकारण व २०टक्के राजकारण या धोरणे नुसार समाजातील सर्व घटकांच्या मदतीसाठी युवासेना तत्पर राहून जनसेनेसाठी सर्वांनी स्वतः ला झोकून देऊन लोकांच्या मदतीसाठी तयार राहावे तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहाण्यासंधर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी युवासेना घुग्घूस शहर प्रमुख चेतन बोबडे यांनी यापुर्वी केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांची प्रशंसा काकडे यांनी केली. सदर कार्यक्रमात युवकासोबतचं महिला, पुरूष कामगार वर्गांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

कार्यक्रमात युवासेना जिल्हा युवा अधिकारी विक्रांत सहारे, गो. वि. सिनेट सदस्य निलेशजी बेलखेडे, नागपूर ग्रामीण युवासेना जिल्हा युवाअधिकारी आकाशजी इंगोले, चंद्रपूर उपजिल्हा अधिकारी रियाज शेख,महेश जिवतोडे , विधानसभा समन्वयक लोकेश कोटरंगे, तालुका सन्वयक सद्दाम कनोजे,चंद्रपूर युवासेना शहर प्रमुख शिवा वझलकर यांची अतिथी म्हणून उपस्थीती होती.

या कार्यक्रम आयोजन शिवसेना शहरप्रमख बंटी घोरपडे, किशोर चौधरी,अक्षय मेश्राम,युवासेना शहर समन्वयक शिवकुमार तागडपेल्ली, सतीश गोहोकार यांच्या सहकार्याने झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here