मुंगोली ओपन कास्ट सहकारी पत संस्थेत संयुक्त पैनलचा विजय

0
372

मुंगोली ओपन कास्ट सहकारी पत संस्थेत संयुक्त पैनलचा विजय

घुग्घूसवे : कोली वणी क्षेत्राच्या मुंगोली ओपन कास्ट कोल फिल्ड कर्मचारी सहकारी पत संस्थेची दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक पार पडली या निवडणुकीत श्रमिक एकता सहकार पैनल व संयुक्त पैनल अमोरासमोर निवडणुकीत उभे होते यात संयुक्त पैनलने बाजी मारली.

संयुक्त पैनल व श्रमिक एकता सहकार पैनलने 11-11 उमेदवार रिंगणात उभे केले होते तर 1 अपक्ष उमेदवार उभा होता संस्थेच्या मतदार यादी प्रमाणे एकूण 278 मतदार सभासद होते यापैकी 257 मतदारांनी मतदान केले तर 21सदस्यांनी मतदानावर पाठ दाखविली.या निवडणुकीत कर्मचाऱ्यामध्ये मोठा उत्साह होता.ही निवडणूक दोन्ही पैनलसाठी प्रतिष्ठाची असतानाही संयुक्त पैनलने श्रमिक एकता सहकार पैनलचा 6 विरुद्ध 5 असा पराभव करून विमानाने छत्री पळविली.

सर्वसाधारण गटातून
विजय बापूराव ताजने 142
उद्धव महादेव मोरे 134
सुधाकर नामदेव बोबडे 130
योगेश कृष्णराव पराते 123
प्रमोद मारोतराव अर्जुनकर 117
पंजाब रमेश मोरे 115
नरेंद्र आनंदराव कुर्लेवार 108
विलास महादेव झाडे 102
हनुमंतू मोरपक्का 102
रवींद्र प्रभाकर जाधव 98
नरसिंग रायमल्लू कलवल 94
महेंद्र जानबा भगत 74
पुंडलिक नानाजी कोट्टे 69

विमुक्त जाती/जमाती गटातून
बालाजी रामदास उपासे 145
गणेश देवराव बुच्चे 102

महिला राखीव गटातून
प्रांजली प्रकाश कोट्टे 142
सोफिया कामिला 131
शारदा दिलीप ठाकरे 123
कनकम गौरम्मा पुलय्या 88

अनुसूचित जाती/जमाती गटातून
सुनिल दयाराम वाघमारे 129
विजय विश्वनाथ सातपुते 113

इतर मागासवर्ग गटातून
गणेश नागोबा रोडे 156
बंडू नामदेव भोंगळे 95
अशा प्रकारे मतदान झाले असून संयुक्त पैनलचे सर्वसाधारण गटातून विजय बापूराव ताजने, उद्धव महादेव मोरे, सुधाकर नामदेव बोबडे,अनुसूचित जाती /जमाती मतदार संघातून सुनिल दयाराम वाघमारे,इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून गणेश नागोबा रोडे,विमुक्त भटक्या जमाती गटातून बालाजी रामदास उपासे तर श्रमिक एकता सहकार पैनलचे सर्वसाधारण गटातून प्रमोद मारोतराव अर्जुनकर, योगेश कृष्णराव पराते, पंजाब रमेश मोरे,महिला राखीव मतदार संघातून प्रांजली प्रकाश कोट्टे व सोफिया काम्मीला हे उमेदवार विजयी झाले.
काही सदस्य जुन्या संचालक मंडळापासून नाराज होते.यामुळे जुन्या व नवीन सदस्यांना संधी देण्यात आली. संयुक्त पैनलने बाजी मारली असली तरी अध्यक्ष पदासाठी चार जण दावेदार असून अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्व मतदाराचे लक्ष लागले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शैलेश मडावी, केंद्राध्यक्ष एस.बी.मुळे, सहकार अधिकारी मनोज पिसाळकर, कुणाल नागभीडकर, नितीन तिरणकर यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली.यावेळी संस्थेचे व्यवस्थापक सुरेश पी. खडसे, लिपिक नंदकिशोर खापणे उपस्थित होते.पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here