जीवनदीप सर्पमित्र व पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने मोफत कॅन्सर, मुखरोग व दंतरोग तपासणी शिबीर

0
513

जीवनदीप सर्पमित्र व पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्ताने मोफत कॅन्सर, मुखरोग व दंतरोग तपासणी शिबीर

राजुरा, 18 डिसेंबर : जीवनदीप सर्पमित्र व पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्ताने टाटा मोमोरिअल हॉस्पिटलचे कॅन्सर तज्ञ डॉक्टरांच्या तर्फे मोफत कॅन्सर, मुखरोग व दंतरोग तपासणी शिबीराचे आयोजन आज संत नगाजी महाराज सभागृह देशपांडे वाडी राजुरा येथे करण्यात आले होते.

चंद्रपुरातील प्रथम कॅन्सर तज्ञ डॉ. गोपीचंद वरटकर व दंत रोग तज्ञ डॉ.योगिता वरटकर या दाम्पत्यांनी या शिबिरात उपस्थित २९ रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले. तोंड व गळ्याचा कॅन्सर, ब्रेन ट्युमर, ब्लड कॅन्सर, स्तन कॅन्सर, अन्ननलिका कॅन्सर, गर्भाशय कॅन्सर यासारख्या सर्व प्रकारच्या कॅन्सर संबंधी तपासणी, ओषधोपचार व रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. बहुसंख्य रुग्णांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या यशस्वीततेकरिता संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लांडे, सचिव रत्नाकर पचारे, उपाध्यक्ष संदीप आदे, सहसचिव प्रविण दुरबडे, कोषाध्यक्ष कैलास निवलकर, सदस्य तुषार खोके, परिमल बोबडे, शेखर खोके, विजय पचारे, अमर पचारे, राहुल दुबे, सचिन खेडेकर, तणय लांडे, सागर नागपुरे, विजय माने, राजू रागीट, सागर भावे, सूरज सोमलकर, संदीप धामणगावकर, राकेश मोरे आदींनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here