खासदार धानोरकरांच्या प्रकृतीत सुधारणे करीता पंचमुखी हनुमान मंदिरात काँग्रेस तर्फे महामृत्युंजय यज्ञ

0
379

खासदार धानोरकरांच्या प्रकृतीत सुधारणे करीता पंचमुखी हनुमान मंदिरात काँग्रेस तर्फे महामृत्युंजय यज्ञ

घुग्घूस : महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार सुरेश (बाळू) धानोरकर यांच्या प्रकृतीत बिघाड आल्याने त्यांना एअर अंबुलस द्वारे दिल्ली येथील वेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. खासदार साहेबांच्या प्रकृती संदर्भात आज सकाळ पासूनच वेगवेगळ्या अफवांना पेव फुटले होते.

खासदार साहेबांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत तातळीने सुधारणा व्हावी याकरीता घुग्घुस शहर काँग्रेसच्या वतीने पांढरकवडा येथील नवसाला पावणारा जागृत देवस्थान श्रीक्षेत्र पंचमुखी हनुमान मंदिरात आज सांयकाळी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने महामृत्युंजय यज्ञ देवस्थानांतील पुजारी यांच्या हस्ते संपन्न झाली.

पदाधिकाऱ्यांच्या वतीने विधिवत पूजा करून सामूहिक प्रार्थना देखील करण्यात आली. यापूर्वी माजी पालकमंत्री विजय वडेटटीवार यांच्या प्रकृतीत बिघाड आला असता त्यावेळेस ही कार्यकर्त्यांनी महामृत्युंजय यज्ञ केला असता त्यांना तातळीने लाभ मिळाला होता.

याप्रसंगी काँग्रेस नेते सुधाकर बांदूरकर,सैय्यद अनवर,अलिम शेख,रोशन दंतालवर,मोसीम शेख,रोहित डाकूर,आकाश चिलका,देव भंडारी,रफिक शेख,सचिन नागपुरे,साहिल सैय्यद, कुमार रुद्रारप,शहजाद शेख,सुनील पाटील,कपिल गोगला,साजिद सैय्यद,अंकुश सपाटे,व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here