विद्युत विभागाचा हलगर्जीपणामुळे ग्राहक विजेपासून वंचित

0
574

विद्युत विभागाचा हलगर्जीपणामुळे ग्राहक विजेपासून वंचित

राजुरा विद्युत विभागाकडून ग्राहकांना नाहक त्रास

राजुरा,अमोल राऊत : सध्या देशात कोरोना महामारीने थैमान घातले असून लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. अशातच वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांची वीज जोडणी विद्युत विभागाकडून कापण्याचा सपाटा सुरु करण्यात आला आहे. अशातच राजुरा उपविभागीय विद्युत विभागाअंतर्गत येणाऱ्या ग्राहकांनी वीज जोडणीसाठी जमा रक्कम भरून सहा सात महिने लोटल्यानंतरही त्या ग्राहकांना विभागाकडून नवीन मीटर देण्यात आला आहे. विद्युत विभागाकडून होत असलेल्या हलगर्जीपणामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून विजेपासून वंचित राहावे लागत आहे.

ऑक्टोम्बर २०२० पासून मीटर मागणीसाठी उपविभागातील ग्राहकांनी जमा रक्कम भरली आहे. प्राप्त माहितीनुसार सहा सात महिने लोटले परंतु अजूनपर्यंत ग्राहकांना मीटर उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. देशातील शेवटच्या खेडे गावापर्यंत वीज पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पण राजुरा उपविभागात मात्र याउलट ग्राहकांची थट्टा करत वेठीस धरण्याचा प्रकार उजेडात आला आहे.

सदर ग्राहकांना विद्युत मीटर उपलब्ध नसल्याचे उपविभागीय अभियंता लोहे यांच्याकडून सांगण्यात येते. आपल्याला आवश्यक असेल तर कंत्राटदाराकडून वीज मीटर घेऊ शकता असा तोकडा सल्लाही देण्यात येतो. विभागाकडे वीज मीटर उपलब्ध नसून खाजगी कंत्रादाराकडे वीज मीटर उपलब्ध असल्याने हाही एक चर्चेचा विषय ठरला आहे. डिमांड रक्कम भरल्यानंतर कंत्राटदाराकडून मीटर घेण्यासाठी ग्राहकांकडून तीन हजारांची मागणी केली जात आहे. यामुळे कंत्राटदार व अभियंता यांचे काही साटेलोटे आहे काय? विद्युत विभागात मोठे घबाड शिजत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सदर कंत्रादाराकडून अभियंत्यास कमिशन मिळते का? असा आरोप वीज ग्राहकातून केल्या जात आहे.

लाईनमेन कडून वीज डिमांड भरलेल्या ग्राहकांचा साधा सर्वेही करण्यात आला नसून याकरिता लाईनमेन ग्राहकांना पैशाची मागणी करतात. पैसे न देणाऱ्या ग्राहकांना वेठीस धरले जाते. लोहे मागील सहा सात वर्षांपासून येथे कार्यरत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवरही शंका उपस्थित करण्यात येत आहे. सदर प्रकरणाची चौकशी करुन तातडीने मीटर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्राहकांची असून चौकशी अंती मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता राजुरा उपविभागात वर्तविण्यात येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here