वंचित बहुजन आघाडी तर्फे बुद्ध विहार येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

0
380

वंचित बहुजन आघाडी तर्फे बुद्ध विहार येथे बुद्ध पौर्णिमा साजरी

 

कोरपना/प्रतिनिधी
बुद्धभूमी गडचांदूर येथे येणारे बौद्ध उपासक तथा उपासिकाना 2584 व्या बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे गडचांदूर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा मार्गदर्शक वामनराव दुबे आणि सरोज वामनराव दुबे यांच्याकडून जलेबी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

 

याप्रसंगी महाकारूणीक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून जलेबी वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

 

यावेळी प्रा. डॉ. सोमा गोंडाणे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी जिल्हा चंद्रपूर तसेच तालुकाध्यक्ष मधुकर चूनारकर, वंचित बहुजन आघाडी चे सर्व कार्यकर्ते दिव्यकुमार बोरकर, साजिद शेख, शरद बोरकर, अनिल वाघमारे, पंकज निरजने, सचिन सोनटक्के, समाधान सोनकांबळे, सुरेश ताडे, संजय घुले, पिंटू रामटेके, विक्की खाडे, लालबहादूर वाघमारे, राज्यपाल बोरकर, सुनिल फुलझेले, पंकज निरनजने तसेच सर्व कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here