संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदांवर पुरूषांची मक्तेदारी

0
482

संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदांवर पुरूषांची मक्तेदारी

चंद्रपूर जिल्हयातील पंधरा तालुक्यात कर्तृत्वान राजकीय महिला नाहीत काय?

महाविकास आघाडी सरकारकडून महिलांचा अपमान – अॅड.पारोमिता गोस्वामी
च्ांद्रपूर :- महाराष्ट राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने नुकतेच संजय गांधी निराधार योजना समितीचे गठन केले.त्यात चंद्रपूर जिल्हयातील पंधराही तालुक्यात एकाही राजकीय क्षेत्रातील महिलांची अध्यक्षपदावर निवड करण्यात आली नाही. समितीच्या अध्यक्षपदावर पुरूषांची मक्तेदारी स्थापन करून आघाडी सरकारने नवरात्रोत्सवात महिलांना डावलण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्रपूर जिल्हयात संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदासाठी एकही कर्तृत्वान महिला योग्य नव्हत्या काय ? अशी प्रतिक्रिया अॅड.पारोमिता गोस्वामी यांनी दिली आहे.
महिला अबला नाही सबला आहेत.त्यांनी स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनायला पाहिजे,अशा मोठमोठया बाता करणा-या महाविकास आघाडीच्या सरकारने पुरूषांना वर्चस्व ठरवून महिलांचा एकप्रकारे अपमानच केला आहे. फुले शाहू आंबेडकरच्या पुरोगामी महाराष्टात महिला पुरूषांच्या खांदयाला खांदा लावून सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेत असताना त्यांना संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदापासून डावलणे हे अतिशय खेदजनक आणि संतापजनक आहे. महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूर जिल्हयातील कमीत कमी पंधरा पैकी सात तरी तालुक्यात नवरात्रीत महिलांना अध्यक्षपदाचा बहुमान देवून त्यांचा गौरव करायला पाहिजे होता. परंतु तसे महान कार्य सुदधा आघाडी सरकारच्या हातून घडले नाही. याचा आम्ही निषेध व्यक्त करीत असल्याचे पारोमिता गोस्वामी यांनी म्हटले आहे.
संजय गाध्ां निराधार योजनेचे जवळपास 80 टक्के लाभार्थी या महिलाच असतात.निराधार ,अनाथ दुर्धर आजाराने ग्रस्त,विधवा,घटस्फोटीत महिलांचा यात समावेश असतो. तेरा सदस्यीय समिती मध्ये विविध प्रवर्गामधून सदस्य म्हणून महिलांची निवड असली तरी अध्यक्षपदापासून त्यांना का डावलण्यात यावे , याचे उत्तर महाराष्ट सरकारने दयावे. चंद्रपूर जिल्हयातील स्थापन करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीचे पूनर्गठन करून किमान सात तालुक्यातील राजकीय कर्तुत्ववान महिलांना अध्यक्षपद बहाल करावे अशी अपेक्षा आघाडी सरकारकडून असल्याची प्रतिक्रिया अॅड.पारोमिता गोस्वामी यांनी दिली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील कॉग्रेस,राष्टवादी कॉग्रेस आणि शिवसेना घटक पक्षातील महिला आघाडीच्या वरिष्ठ महिला नेत्या याबाबत कशाला चुप्पी साधून आहेत हे एक न उलगडणारे कोडेच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here