टिनूने केला आपला वाढदिवस बालसदन अनाथलयात साजरा!

0
514

टिनूने केला आपला वाढदिवस बालसदन अनाथलयात साजरा!

चंद्रपूर । किरण घाटे

वाढदिवस म्हटला कि ताे आपल्या कुंटुबात किंवा मित्रमंडळीत बहुधा साजरा केला जाताे .परंतु महाराष्ट्रातील सुपरिचीत एवरप्रेझेंस संस्थेत कार्यरत असणां-या चंद्रपूर नगरीतील टिनू देठेे या तरूणीने काल गुरुवार दि.२२आँक्टाेबरला येथील स्थानिक सेवासदन अनाथयालातील चिमुकल्यांच्या सहवासात दुपारी जावून आपला वाढदिवस साजरा केला. या वेळी सेवाभावी संस्था एवरप्रेझेंस या सामाजिक बहुद्देशीय संस्थाचे अध्यक्ष रितीक बेतावार, शिवांगी परवेकर व प्रांजली देठे उपस्थित हाेत्या. वाढ दिवस निमित्त या अनाथलयातील चिमुकल्यांना टिना देठे यांनी आपल्या हस्ते विविध फळांचे वितरण केले. चिमुकल्यांनी टिनाला (या शुभ दिनी )वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा दिल्या .दरवर्षि घरगुती वातावरणात वाढदिवस साजरा करणा-या टिनाने या वर्षि मात्र अनाथलयात आपला वाढदिवस साजरा केला .चिमुकल्यात वाढदिवस साजरा करतांना मला अतिशय आनंद झाल्याची भावना तीने या वेळी आपल्या बाेलण्यातुन व्यक्त केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here