खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा घुग्घुस शहरात जंगी स्वागत

0
57

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा घुग्घुस शहरात जंगी स्वागत

महिलांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न करेल : प्रतिभा धानोरकर

घुग्घुस : चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस व इंडिया आघाडीचे विजयी उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांची विजयी मिरवणूक व नागरी सत्कार कार्यक्रम 19 जून रोजी स्नेहप्रभा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले. सांयकाळी सात वाजता विजयी मिरवणूक काँग्रेस जनसंपर्क कार्यालय येथून निघाली.

विजयी रथात खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे,तालुकाध्यक्ष अनिल नुरुले,काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी,लक्ष्मण सादलावर,शिवसेना प्रमुख बंटी घोरपडे,प्रभाकर चिकणकर,गणेश शेंडे,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अध्यक्ष दिलीप पिटटलवार,आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित बोरकर,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
डिजे फटाक्यांची आतिषबाजी,करीत जल्लोषात विजयी मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने स्नेहप्रभा मंगल कार्यालय याठिकाणी पोहचली. याठिकाणी आभारसभा व नागरी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला.
शहर काँग्रेस कमिटी,महिला काँग्रेस कमिटी सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशन वतीने भव्य खासदार प्रतिभाताई धानोरकर तथा आमदार सुभाष धोटे यांना भव्य पुष्पहार घालून मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
शहरातील विविध सामाजिक संघटना,धार्मिक संघटना,व्यापारी संघटना,ज्येष्ठ नागरिक संघ, भजन मंडळ,लिकर असोसिएशन, जय श्रीराम क्रीडा मंडळ,ख्रिश्चन पास्टरेट कमिटी,मुस्लिम समाज कमिटी, आदिवासी समाज बांधव,नवबौध्द स्मारक तथा बहुउद्देशिय समिती,
आशा वर्कर, व नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला
आपले मनोगत व्यक्त करतांना आ. सुभाष धोटे यांनी भाजप नेत्यांवर हल्ला चढवित ही निवडणूक आम्ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढविली व आपण सर्वांनी आम्हाला मतदानरुपी आशीर्वाद देऊन विजयी केले आम्ही आपले आभार लोककार्यतुन व्यक्त करू असे मनोगत व्यक्त केले
आपल्या अध्यक्षीय संबोधनात खासदार धानोरकर यांनी आपला विजय मतदारांना समर्पित करीत घुग्घुस शहरातील महिलांच्या रोजगार प्रश्ना साठी विशेष प्रयत्न करणार ,आशा सेविकांच्या समस्या निवारण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याची ग्वाही दिली तसेच कार्यकर्त्यांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी करिता कामाला लागण्याचे ही आवाहन केले.
याप्रसंगी मंचावर काँग्रेस पक्षाचे नेते लक्ष्मण सादलावार, नारायण ठेंगणे,शामराव बोबडे,रामपाल वर्मा,अनिरुद्ध आवळे,ब्रिजेश सिंग,मुन्ना लोहानी,सुरज कन्नूर,अलीम शेख,हेमंत उरकुडे,लखन हिकरे,प्रशांत सारोकार,महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद,महिला शहर अध्यक्ष संगीता बोबडे,जिल्हा महासचिव पदमा त्रिवेणी,महासचिव पुष्पा नक्षीने,संध्या मंडल,मंगला बुरांडे,डॉ.राणी बोबडे,निर्मला जोगी,ज्योत्स्ना सूर,सुजाता सोनटक्के,माधुरी सुटे,पूनम कांबळे,प्रीती तामगाडगे शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बंटी घोरपडे,ज्येष्ठ नेते प्रभाकर चिकणकर,गणेश शेंडे,हेमराज बावणे,चेतन बोबडे,वेदप्रकाश मेहता, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष दिलीप पिटटलवार, शरद कुम्मरवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन देव भंडारी यांनी केले तर आभार प्रदर्शन हेमंत उरकुडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय उपाध्ये,अलिम शेख, मोसीम शेख,रोशन दंतालवर,विशाल मादर,रोहित डाकूर,अनुप भंडारी,नुरुल सिद्दीकी,आकाश चिलका,सुनील पाटील,शहजाद शेख,थॉमस अर्नाकोंडा,दिपक पेंदोर,दिपक कांबळे,कपील गोगला,अरविंद चहांदे,शहशाह शेख,बालकिशन कुलसंगे, प्रताप तांड्रा,भैय्या भाई,सन्नी मंडल,अंकुश सपाटे,हरीश कांबळे, प्रशांत अडडूर,तन्मय गहूकर,रंजित राखूडे यांनी अथक परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here