भाजपा महिला आघाडीतर्फे महिला दिन साजरा

0
394

भाजपा महिला आघाडीतर्फे महिला दिन साजरा

महिला जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम यांचे मार्गदर्शन ; महिला सक्षमीकरण काळाची गरज

 

राजुरा : जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्य (दि.११) राजुरा शहर महीला आघाडीच्या वतीने विविध उपक्रमातून साजरा करण्यात आला. यावेळी महिलांच्या या मेळाव्यात आभूषणावर आधारित रांगोळी स्पर्धा व गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती याचबरोबर माता जिजाऊ च्या भूमिकेत एकपात्री अभिनय नगरसेविका उज्वला जयपूरकर हिने सादर केली.

यावेळी कार्यक्रमाच्या उदघाटक म्हणून भाजप जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा पोंभुर्णा पंचायतीच्या समितीच्या सभापती अल्काताई आत्राम उपस्थित होत्या यावेळी महिलांना आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की, महिला सक्षमीकरण ही काळाची गरज असून महिलांनी राजकारणात अधिक सहभागी होऊन नेतृत्व करण्यासाठी समोर येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी गडचांदूर न. प. माजी अध्यक्ष विजयालक्ष्मी डोहे, पंचायत समिती सदस्य तथा महिला तालुका अध्यक्षा सूनंदा डोंगे, जिल्हा उपाध्यक्ष रेखाताई देशपांडे, माजी नगर सेवक श्रीमती उज्वला जयपूरकर, प्रीती रेकलवार, राधेश्याम अडनिया, राजेंद्र डोहे,जिल्हाउपाध्यक्ष तथा खमोना सरपंच हरिदास झाडे, आदिवासी नेते वाघुजी गेडाम, सचिन सिंग बैस व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात ज्येष्ठ महिलांचा सत्काराबरोबर ई-श्रमिक कार्ड चे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक राजेंद्र डोहे, श्रीमती उज्वला जयपूरकर, प्रिती रेकलवार, रेखाताई देशपांडे, कांता कदम, निसर्ग लॉन चे संचालक प्रदिपजी देशपांडे, गणेश रेकलवार, सचिन बैस, राजू वाटेकर, व इतर कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here