प्रहार च्या एका फोनने चार दिवस बँकेची फेल झालेली लिंक एक तासाच्या आत सुरु

0
364

प्रहार च्या एका फोनने चार दिवस बँकेची फेल झालेली लिंक एक तासाच्या आत सुरु

प्रहारचे बिडकर यांनी सोमवार पर्यन्त लिंक सुरु न झाल्यास बँकेला कुलूप लावण्याचा दिला होता इशारा

एस बी आय चंद्रपुर चे हेड सीसीर पटनाईक साहेंबानी एक तासाच्या आत सुरु करुन दिली लिंक

गडचांदूर । प्रतिनिधी प्रवीण मेश्राम : शेतकऱ्यांना कुठं कधी कोणता त्रास होईल हे काही सांगता येत नाही शेतीचा हंगाम कापूस सोयाबीन साठी लावलेले मजूर त्यांना द्यासाठी मजुरीला लागणारे पैसे यासाठी दिवस रात्र मरमर करणे, हेच त्यांच्या नशिबी येतात.
अशीच एक घटना कवठाळा येथील भारतीय स्टेट बँकेचा भोंगळ कारभार समोर आला चार दिवसा पासून लिंक फेल होती या मुळे शेतकऱ्यांचे रोज दिवस भर बँके समोर आपली रोजी रोटी बुडवून व्यवहार करायला शेतकरी उभा राहायचा पण बँक कर्मचाऱ्यांचा मुजोरी व अरेवारी चवट्यावर आलेली असताना बँकेची चार दिवसापासूनची लिंक फेल दाखवने शेतकऱ्यांसाठी डोके दुःखी ठरली अशातच एका शेतकऱ्याने प्रहार चे सतिश बिडकर यांना या समस्यांची माहिती दिली तेव्हाच बिडकर यांनी भारतीय स्टेट बँक चंद्रपुर हेड ऑफिस ला फोन केला सम्बधित अधिकाऱ्यांशी या बाबत माहिती घेतली व आज लिंक सुरु न झाल्यास सोमवरला शेतकऱ्यांना घेऊन बँकेला टाळे लावू असा सज्जळ दम त्या अधिकाऱ्याला दिला पटनाईक साहेंबानी लगेच लिंक सुरु करण्याचे आश्वासन दिले लगेच एक तासाच्या आत अधिकाऱ्यांचा फोन आला की लिंक सुरु करण्यात आली व काही अडचण आल्यास कळवा त्यानंतर काही वेळात शेतकऱ्यांचा फोन आला की आपन केलेल्या सहकार्याने बँकेची चार दिवसापासून बंद असलेली लिंक एक तासाच्या आत सुरु करण्यात आली त्या बद्दल शेतकऱ्यांनी प्रहारचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here